Baramati Assembly by-election : बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी

- निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहन


ठाणे : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे.


दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. ठाणे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना याच भावनेतून सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले.


महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) बारामती पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.


एकीकडे काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : संजय राऊत - राहुल गांधींच्या भेटीवरून भाजप आक्रमक; ‘उबाठा संपवण्याची सुपारी’ घेतल्याचा आरोप

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घेतलेल्या

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून