जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख लाटण्याचा प्लॅन रचला. पण, हा कट फक्त ५० लाखांसाठी नव्हताच. हे प्रकरण आता ७ कोटी रुपयांचं असल्याचं उघड झालं आहे.


५० लाखांचा अपघाती विमा लाटण्यासासाठी जळगावमध्ये एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करून ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला. या प्रकरणात मृताची बायको, भाऊ आणि चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि मेहुनबारे पोलीस ठाण्यातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे.


प्रकरण काय ?
राजेंद्र शालिंदर जाधव यांच्या कथित अपघाती मृत्यूबाबत श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सिडेंट विम्याचा दावा पत्नी अरुणा जाधव यांनी केला होता. दावा करताना १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना मोटरसायकलला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिल्याने जाधव जखमी होऊन चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आलं होतं. यावेळी चाळीसगाव ग्रामीण येथील डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना पोलिसांनी प्राथमिक अहवालाासह पोस्टमार्टम रिपोर्ट दिला होता. त्यानंतर याप्रकरणी मेहुनबारे पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. ८६/२०२५ अशी नोंदही करण्यात आली होती.


विमा कंपनीने एका खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडून चौकशी केल्यानंतर मोठ्या विसंगती आढळल्या. तपासात राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजारानं झाल्याचं समोर आले. चौकशीदरम्यान त्यांच्या घरात लावलेल्या फोटोवरही मृत्यूची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ अशी नमूद असल्याचं आढळलं. तसंच ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्येही त्यांची नोंद नसल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झाले. याशिवाय मृताच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळे पत्ते असल्याचे तसंच त्यांच्या नावावर इतर सुमारे १० विमा कंपन्यांकडूनही पॉलिसी घेण्यात आल्याचे समोर आले.

Comments
Add Comment

Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत

पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा

SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी १ व ३ एप्रिल रोजी येलो तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल

Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे