युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत, नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका

मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळे तेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातही पेट्रोल, डिझेल महागण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच आता या युद्धामुळे नाशिकच्या अंबड व सातपूर एमआयडीसी येथील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस पुरवठ्याअभावी येथील १२०० उद्योगांना फटका बसण्याची शक्यता दिसत आहे.

युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम


इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर तीव्र परिणाम झाल्याने नाशिकमधील तब्बल बाराशे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग प्रभावित झाले आहेत. शासनाने व्यावसायिक एलपीजी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर एमएनजीएलकडून ४० टक्के पुरवठा कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्लेटिंग, पावडर कोटिंग उद्योग संकटात सापडले आहेत.

तर काही उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकला नियमित एक हजार २०० टन दरमहा एलपीजी गॅसचा पुरवठा इंडस्ट्रीजला केला जातो आणि २ हजार टन एलपीजी गॅस हॉटेल वगैरे ठिकाणी पुरविला जातो. तर साडेतीन लाख किलो एमएनजीएल गॅसचा पुरवठा केला जात आहे. मात्र, युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर तीव्र परिणाम झाला आहे.

१२०० उद्योग बंद होण्याच्या मार्गावर


सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असे सूक्ष्म, लघु, मध्यम सुमारे १२०० ते १३०० उद्योग आहेत. सूक्ष्म उद्योगांना दररोज १०० ते २०० किलो, मध्यम उद्योगांना दीड टन किलो आणि मोठ्या उद्योगांना फरनेससाठी अधिक गॅस लागतो. यात ९७ टक्के एलपीजी घरगुती वापरासाठी आणि ३ टक्के व्यावसायिक वापरासाठी दिला जातो.

आता ३ टक्के व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. शिवाय सरकारने एलपीजी गॅस पुरवठा बंद करून दर ६८ रुपयांवरून ८६ रुपये केला आहे. आणि सबसिडीदेखील बंद करून टाकली आहे. त्यामुळे एलपीजी वापर करणारे उद्योग पूर्णपणे संकटात सापडले आहेत. एमएनजीएलची पाइपलाइन सर्व उद्योगात पोहोचलेली नाही. तरीही एमएनजीएलने ४० टक्के पुरवठा कमी करण्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे बाराशे उद्योग 'गॅस'वर असून, प्रक्रिया ठप्प होण्याची भीती आहे.
Comments
Add Comment

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा पणन मंत्री जयकुमार रावल

वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था मुंबई : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून

Pandharpur News : पंढरपुरात पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या कारसह ४ किलो गांजा जप्त

पंढरपूर : पंढरपूर शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती