अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा आढावा घेतला जातो. परंतु, पुन्हा त्याची पुनरावृत्ती होतानाचे पाहायला मिळत आहे. अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीमध्ये आज केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर आगीचा भडका आणि धुराचे मोठ-मोठे लोट पसरल्याचंही दिसून आलं.


स्फोटानंतर कंपनीतील केमिकल रस्त्यावर आल्याने रस्त्यावर देखील आगीचा भडका पाहायला मिळाला, धुराचेही लोटही दूरवर पसरले होते. स्फोट होताच कंपन्यांमधील कामगारांनी हातातील काम थांबवत जिवाच्या आकांताने धाव घेतली. कामगार रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसून आले.


दरम्यान, आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र, केमिकल कंपनीतील आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत आहेत. कंपनीत आगीमुळे मोठमोठे स्फोट होत असल्याने कामगारांची धावपळ पाहायला मिळत असून, कंपनीतील विविध केमिकलमुळे विविध ठिकाणी स्फोट होत आहेत.


एमआयडीसीमधील गणेश केमिकल नावाच्या कंपनीला ही आग लागली आहे. आगीचा भडका इतक्या मोठ्या प्रमाणात उडाला की, शेजारी असलेल्या मिरॅकल केबल आणि क्लाउड नाईन या कंपन्यांनादेखील आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Comments
Add Comment

जळगाव : सोन्याचा भाव दीड लाखांच्या उंबरठ्यावर

गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढले चांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढ जळगाव : सोन्या-चांदीच्या

केळीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी वर्ग हवालदिल

जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची

पुणे - वाहन क्रमांक आरक्षणासाठी २ एप्रिलपासून फेसलेस सेवा सुरू

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची

Akola Crime : अकोल्यात वर्दीला काळिमा फासणारी घटना; कोठडीतल्या महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

अकोला : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्राच्या पोलिसांचे ब्रीदवाक्य, ज्याचा आदर संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

कुंभमेळ्याच्या रिंग रोडला असलेला अडथळा अखेर संपला

उपजिल्हाधिकारी वाघांच्या मदतीला यश नाशिक : मागील काही दिवसांपासून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी अडकून

सोलापूर : घराच्या आवारात गांजाची लागवड; गुन्हे शाखेची धडक कारवाई, २१ किलो गांजासह आरोपी जेरबंद

सोलापूर : सोलापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सहसा ग्रामीण भागात किंवा दुर्गम