अल्पवयीन मुलीचं शोषण करत धर्मांतरासाठी दबाव, भिवंडीतील संतापजनक प्रकार समोर

भिवंडी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि तिला आंतरधर्मीय विवाहासाठी धमकावणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडीत टेलर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने संबंधित मुलीवर अत्याचार करून तिला धर्मांतरासाठी भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये आरोपी आणि पीडित मुलगी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी १८ वर्षांचा होता, तर मुलगी अल्पवयीन होती. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, आरोपीने तिच्या अल्पवयीन असण्याचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे शोषण सुरू होतं.



विवाहासाठी दबाव आणि 'निकाह'चा घाट



गेल्या महिन्यात पीडित मुलगी १८ वर्षांची झाल्यावर आरोपीनं तिच्यावर लग्नासाठी (निकाह) दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने तिला ब्लॅकमेलही केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. ६ मार्च रोजी निकाहसाठी मुलगी भिवंडीत पोहोचली होती. पण, एका हिंदुत्ववादी संघटनेला याची कुणकुण लागली आणि त्यांनी मुलीच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.



निकाहचा पर्दाफाश



विवाहाचा विधी (निकाह) पार पडण्यापूर्वीच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलीची तिथून सुटका केली. त्यानंतर मुलीला स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं आहे.


डोंबिवली पोलिसांनी आरोपीला पॉक्सो (POCSO) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमान्वये अटक केली आहे. हा गुन्हा २०२४ मध्ये घडल्याने, नवीन भारतीय न्याय संहितेऐवजी आयपीसी अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर आरोपी मुलीवर लग्नासाठी सातत्याने दबाव आणि ब्लॅकमेलिंग करत होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, यामागे आणखी कोणाचा हात आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत

पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा

SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी १ व ३ एप्रिल रोजी येलो तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल

Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे