सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक पाहणी केली. या रुग्णालय इमारतीचे बांधकाम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतानाही आजही या इमारतीचे बांधकाम अर्धवटच आहे. त्यामुळे सिद्धार्थ रुग्णालय पुनर्विकास प्रकल्पाची सद्यस्थिती तसेच हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा आराखडा त्वरित सादर करावा,असे सक्त निर्देशही महापौरांनी दिले आहेत.


मुंबई महापौर रितू तावडे या गोरेगाव येथे प्रभाग समिती निवडणुकीसाठी गेल्या असता गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थनगरमधील सिद्धार्थ महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी अचानक दौरा केला. त्यावेळी त्यांनी पाहणीनंतर कामांच्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत विविध निर्देश दिले. उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, रुग्णालय पायाभूत सुविधा कक्षाचे सहायक अभियंता रवींद्रनाथ यादव यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


सिद्धार्थनगर, गोरेगाव पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, मालाड पश्चिम, मालवणी, आरे कॉलनी या भागातील सुमारे ८ ते १० लाख लोकसंख्येसाठी आरोग्य सेवेची गरज पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थ महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. १० एप्रिल २०२३ रोजी प्रत्यक्ष बांधकाम सुरु झाले. एकूण ३०६ रुग्णशय्या क्षमतेचा हा प्रकल्प पावसाळ्यासह ३६ महिन्यांच्या कालावधीमध्ये म्हणजे एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण अपेक्षित होते. मात्र पावसाळ्यात खोदकामप्रसंगी भूस्खलन, शवविच्छेदन केंद्राची इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर जुन्या केंद्राचे स्थलांतर व त्या जागी नवीन इमारतीचे बांधकाम, उपयोगिता वाहिन्यांचे स्थलांतर यासह इतर प्रशासकीय व तांत्रिक अडचणी अशा विविध कारणांमुळे प्रकल्प लांबला आहे. शवविच्छेदन केंद्र बांधून शासनाकडे मार्च २०२५ मध्ये हस्तांतरित केले आहे. तर अकरा माळ्यांच्या दोन रुग्णालय इमारती बांधकामामध्ये सध्या दहा मजल्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. शवविच्छेदन केंद्राच्या पूर्वीच्या जागी आता नवीन इमारत बांधण्यासाठी पाया खोदून काम सुरु करण्यात आले आहे. तर कर्मचारी निवासस्थाने व निवासी वैद्यकीय अधिकारी निवासस्थाने यांच्या प्रत्येकी २१ मजली इमारती नियोजित आहेत. त्यांचे २० माळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. सर्व इमारतींचे मजले पूर्ण झाल्यावर अंतर्गत कामे सुरु होवून ती पूर्ण होण्यास दोन वर्षे अपेक्षित आहेत, अशी माहिती रुग्णालय पायाभूत सुविधा कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. संपूर्ण प्रकल्प तसेच इमारतींच्या पाहणीअंती व प्राप्त माहितीनंतर महापौर रितू राजेश तावडे यांनी या प्रकल्पाच्या दिरंगाईबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदलले; रविवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन