Mumbai Metro : महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई मेट्रो लाईन ३ (अ‍ॅक्वा लाईन) वरील मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ही दोन महत्त्वपूर्ण मेट्रो स्थानके ८ मार्च २०२६ रोजी पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून संचलित केली जाणार आहेत. शहरी वाहतूक क्षेत्रामध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


या दोन्ही स्थानकांवरील दैनंदिन कामकाजामध्ये स्थानक नियंत्रण, तिकीटिंग, प्रवासी सहाय्य, सुरक्षा व्यवस्था, देखभाल सहाय्य आणि हाऊसकीपिंग अशा विविध जबाबदाऱ्या महिलांकडे असतील. दिवसभरातील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मिळून एकूण ८५ महिला कर्मचारी या स्थानकांचे कामकाज सांभाळतील.


याशिवाय, अ‍ॅक्वा लाईनच्या संचालनामध्ये २७ महिला ट्रेन ऑपरेटर्स (मेट्रो पायलट) महत्त्वाची भूमिका बजावत असून त्या नियमितपणे मेट्रो गाड्यांचे संचालन करत आहेत. एकूणच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये १,३८८ महिला कर्मचारी विविध स्तरांवर कार्यरत आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचारी तसेच ऑपरेशन्स, तिकीटिंग, हाऊसकीपिंग आणि सुरक्षा सेवांमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा