कर्नाटकापाठोपाठ आंध्रातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी

बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केला. सोशल मीडियाचा वापर वाढला असून आता सर्वच वयोगटातील लोक याच्या आहारी गेलेले दिसतात. विशेषतः लहान मुलांवर याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. यानंतर लहान मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याची गरज अनेकांनी बोलून दाखवली होती. कर्नाटक राज्याने याबद्दल पुढाकार घेतला असून शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी असेल, अशी घोषणा केली. कर्नाटक सरकारकडून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४.४८ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपक्रम आणि मुलांना ऑनलाईन धोक्यांपासून सुरक्षित करण्यासाठी नियामक उपायांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या निर्णयाबाबत बोलत असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, वाढत्या मोबाइल वापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात येत आहे. या नियमाची अंमलबजावणी जेव्हा होईल, तेव्हा असे नियमन करणारे कर्नाटक हे पहिले राज्य असेल. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे मानसिक आरोग्य, झोप आणि सुरक्षेवर परिणाम होत असल्याबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


कर्नाटक उच्च न्यायालयाने दिली होती सूचना : समाजमाध्यमांचा वापर करण्यासाठी सरकारने वयोमर्यादा निश्चित करण्याचा विचार करावा, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वी २०२३ मध्ये दिली होती. मद्यपान करण्यासाठी वयोमर्यादा आखून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याचा विचार व्हावा, असे न्या. जी. नरेंदर आणि न्या. विजयकुमार पाटील यांच्या खंडपीठाने सुचवले होते. दिवसभरामध्ये मुलांचा अभ्यास व खेळाएवजी अधिकाधिक वेळ मोबाईल पाहण्यात तसेच सोशल मीडियावर रिल्स पाहण्यात तसेच चॅट करण्यातच जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.


देशभरात चर्चा : हा निर्णय लागू झाल्यास इतर राज्ये आणि केंद्र सरकार याकडे लक्ष देतील, अशी शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि गोवा यांसारख्या राज्यांमध्येही या संदर्भात चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय देशांप्रमाणे भारतातही मुलांसाठी डिजिटल संरक्षण कायदे मजबूत होण्याची ही सुरुवात ठरू शकते.


आंध्र प्रदेशमध्येही बंदी : कर्नाटकप्रमाणेच आंध्र प्रदेशात १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियावरील वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्याची योजना मांडण्यात आली आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी घोषणा केली की, पुढील ९० दिवसांत १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली जाईल. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ही बंदी १३ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी वाढवायची की नाही यावर ते चर्चा करत आहेत.

Comments
Add Comment

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात