Israel - Iran War : इराणी युद्ध नौकेवरील हल्ल्यात आतपर्यंत ८० ठार, तर अनेक बेपत्ता

- अमेरिकेने अधिकृतपणे घेतली हल्ल्याची जबाबदारी


श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुधवारी (४ मार्च) इराणी नौदलाच्या जहाजावर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला करुन ते नष्ट केले. या हल्ल्यात आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अशाप्रकारची ही पहिलीच घटना असून अमेरिकेने अधिकृतपणे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.



हल्ला कसा झाला ?


विशाखापट्टणम येथे आयोजित बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलान-२०२६ मध्ये सहभागी झाल्यानंतर ईराणची मौज-क्लास फ्रिगेट प्रकारची ‘इरिस डेना’ ही युद्धनौका मायदेशी (ईराणला) परत निघाली होती. यावेळी अमेरिकेच्या पाणबुडीने या जहाजाला लक्ष्य बनवले. या हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाचे प्रवक्ते बुद्धिका संपथ यांनी सांगितले की जहाज बुडल्यामुळे तब्बल ८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की हल्ल्याच्या वेळी जहाजावर एकूण १८० लोक होते आणि संकटाबाबत सूचना मिळताच श्रीलंकेने नौदलाची जहाजे आणि वायुसेनेची विमाने बचाव मोहीमेसाठी पाठवली. श्रीलंकेच्या आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अनिल जयसिंघे यांनी सांगितले की ७९ जणांना रुग्णालयात नेण्यात आले, त्यातील एका जणाची प्रकृती गंभीर आहे. तर ७ जणांना तातडीचे उपचार देण्यात येत आहेत, तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत.



अमेरिकेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी :


अमेरिकेच्या संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले की, एक अमेरिकी पाणबुडीने आंतरराष्ट्रीय जलसंधीतील ईरानी युद्ध नौकेवर हल्ला केला. हा दुसरा महायुद्धानंतर शत्रूवरील पहिला असा हल्ला आहे. यापूर्वीच श्रीलंकेच्या नौदलाने हिंद महासागरात जहाज डुबल्याची माहिती दिली होती. पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष आता आणखी गंभीर झाला आहे. अमेरिकेने आणि इस्राएलने तेहरानसह अनेक शहरांवर हवाई हल्ले केले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धात ईराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती वेगाने बिघडली आहे.



परिस्थिती तणावपूर्ण : 


संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की हिंद महासागरातील अशा सैन्य कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांची सुरक्षा संकटात येऊ शकते. श्रीलंका सध्या मानवी बचाव मोहिमेवर लक्ष केंद्रित करत आहे, परंतु ही घटना सूचित करते की युद्ध आता समुद्री मोर्च्यावरही खुलेपणाने दिसून येऊ लागले आहे. मध्य पूर्व आणि हिंद महासागर क्षेत्रातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण राहिली आहे.



आतापर्यंतचा घटनाक्रम :


- अमेरिका आणि इस्राएलने इराणमधील सुमारे २ हजार ठिकाणे लक्ष्य केले आहेत.
- हल्ल्यांचा फोकस परमाणु सुविधा, बैलिस्टिक क्षेपणास्त्र लाँचर आणि लष्करी नेतृत्वाच्या ठिकाणी होता.
- याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हॉर्मुज जलसंधी बंद केली आहे.
- इराणकडून तेहरानने तेल अवीव आणि यरुशलमसह इस्राएलच्या शहरांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले
- आखाती देशांमधील अमेरिकी ठिकाणेही हल्ल्यांमध्ये लक्ष्यात आले आहेत.
- इराणी युद्ध नौकेवरील हल्ला : आतपर्यंत ८० ठार, अनेक बेपत्ता


Comments
Add Comment

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले

नेपाळमध्ये सत्तांतरानंतर नवा संदेश; बालेन शाह- मोदी संवादातून संबंध दृढ होण्याचे संकेत

काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी

Nepal News : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांच्या कारवाईत माजी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अटक

नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील

Iran-US-Israel War : इराणने केले अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी (२७ मार्च) अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त

Pakistan embassy in Tehran : तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ धमाके; परिसरात भीतीचे वातावरण

तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना