Pakistan embassy in Tehran : तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ धमाके; परिसरात भीतीचे वातावरण

तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तान हे इराण आणि अमेरिका यांच्यात शांततेसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा हल्ला झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, तेहराणवरील हवाई हल्ले तीव्र झाल्याची माहिती आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्फोट दूतावासाच्या अगदी शेजारील परिसरात झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी राजदूत आणि दूतावासातील कर्मचारी सुरक्षित आहेत. मात्र, अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा हल्ला गुरुवारी (२६ मार्च) रात्री सुमारे ८ वाजता पसरदान परिसरात झाला, जिथे दूतावास आणि राजदूताचे निवासस्थान आहे. स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा असल्याने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, दूतावासाशेजारीच इराणी लष्कराचे एक ठिकाण आहे. हे लक्ष्य असताना हल्ला चुकून दूतावासाजवळ झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट अत्यंत शक्तिशाली होता, मात्र दूतावास किंवा निवासस्थानांचे कोणतेही नुकसान झाले नाही. जर हा स्फोट थोडा अधिक जवळ झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.


स्फोटानंतर दूतावासातील कर्मचारी भीतीच्या छायेत असले तरी काम सुरू ठेवत असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर पाकिस्तान सरकारने तेहरान प्रशासनाशी संपर्क साधला असून, मित्र राष्ट्रांनाही याबाबत माहिती देण्याची तयारी सुरू आहे.


दरम्यान, इराण - अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची मध्यस्थीची ऑफर इराणने फेटाळल्याची माहिती आहे. अमेरिकेने मात्र पुढील दीड आठवड्यासाठी हल्ले थांबवण्याचे संकेत दिले आहेत. आता पुढील पाऊल काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना