Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी उडवली आणि आजीने संतापाच्या भरात असं काही केलं की तो लहान मुलगा चक्क ४५ टक्के भाजला.


 


नेमकं घडलं काय ?


नागपुरातील कोराडी परिसरात होळीच्या दिवशी एक भयंकर आणि संतापजनक घटना घडली आहे. तर झालं असं ओम हरीश वांगे हा चार वर्षांचा चिमुरडा घराबाहेर होळी खेळत होता. त्याच वेळी त्याची आजी गरम घराबाहेरून गरम पाणी घरात नेत होती. खेळण्याचा नादात ओमने आजीच्या अंगावर पिचकारीने पाणी उडवले आणि या किरकोळ घटनेमुळे आजीचा राग अनावर झाला, हातातील बादलीत असलेले पूर्ण गरम पाणी तिने ओमच्या अंगावर ओतले. उकळते पाणी अंगावर पडताच अंग भाजल्याने ओम वेदनेने ओरडू लागला.


ओमचा ओरडाओरड ऐकून शेजारी धावून आले तातडीने त्याच्या अंगावर थंड पाणी जरी ओतले तोपर्यंत कंबरेखालुन मुलगा चांगलाच भाजला आहे. प्राथमिक माहितीनुसार ओम ४५ टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Comments
Add Comment

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने