शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा पोहोच रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून या रस्त्याचे काम आता वाढले गेले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बाधकामाचाही खर्च वाढला गेला आहे. त्यामुळे या रस्त्याचा खर्च सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च वाढला गेला असून त्यामुळे या पोहोच रस्त्याचा खर्च सुमारे २६ कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे.


शीव रेल्वेच्या पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या काम हाती घेण्यात आले असून या पुलाच्या बांधकामाच्या आड येणारे पूलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या रेल्वेवरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रेल्वेवरील पुलाच्या पुनर्बांधणीकरता येणारा खर्च मध्य रेल्वेच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे पुलाच्या पोहोच रस्त्याचे महापालिका हद्दीतील काम महापालिकेमार्फत करण्यात येत असून या पुलाच्या पोहोच रस्त्याच्या बांधकामासाठी निरज सिमेंट स्ट्रक्चरलस लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.


या पुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामांमुळे जाे अडथळा निर्माण झाला आहे, त्यामुळे मूळ बांधकाम पध्दत म्हणजे रिटेनिंग भिंत यामध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी पाईल कॅपह टच पाईल अशा पध्दतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रकल्प खर्चात वाढ होत असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव प्रकल्प खर्च हा रेल्वेकडून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढीव कामांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या पध्तदीनुसार पोहोच रस्त्याच्या कामांसाठी २१.४४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. परंतु आता हा खर्च वाढल्यामुळे वििवध करांसह २५.८४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या विभागाकडून या कामांसाठी १३.१४ कोटी रुपये एवढा निध फेब्रुवारी २०२४ रोजी महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम मध्य रेल्वेकडून वसूल करण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी