Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचा मानस व्यक्त करत मुंबई महापौर रितू तावडे यांनी डबेवाल्यांसाठी लवकरच १०५ ई-बाइक्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. पूर्वीच्या तुलनेत डबेवाल्यांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी या सेवेचा गौरव आणि प्रतिष्ठा आजही तितकीच उंचावलेली आहे. व्यवस्था केवळ जेवण पोहोचवण्यापुरती मर्यादित नसून उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सेवा संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. डबेवाले हे खऱ्या अर्थाने मुंबईच्या कार्यसंस्कृतीचे राजदूत आहेत असेही गौरवोद्गार महापौरांनी मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या पाहणी प्रसंगी काढले.


महापौर रितू तावडे यांनी वांद्रे (पश्चिम) येथील रिझवी महाविद्यालय परिसरातील ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र’ ला काल मंगळवारी २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली तसेच डबेवाल्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. डबेवाला केंद्र भेटीप्रसंगी नगरसेविका स्वप्नाली म्हात्रे, नगरसेविका सायली कुलकर्णी, मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे, नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, सचिव विनोद शेट्टी, तसेच अनुभव केंद्राचे सुबोध सांगळे आणि डबेवाला संघटनेचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.


याप्रसंगी महापौरांनी महापौरांनी डबेवाल्यांच्या दैनंदिन कामकाजातील ‘सॉर्टिंग’ (वर्गीकरण), ‘कोडिंग’ आणि वितरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. अत्यंत गुंतागुंतीची ही प्रक्रिया अत्यल्प त्रुटींनी पार पाडत लाखो डबे वेळेत पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र हे डबेवाल्यांच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन व प्रसार करणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे डबे वर्गीकरण, कोडिंग आणि वितरण प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. डिजिटल आणि इंटरॅक्टिव्ह माध्यमांतून या सेवेचा इतिहास व परंपरा अभ्यागतांना समजावून सांगितली जाते. त्याची पाहणी महापौर तावडे यांनी केली.


केंद्रातील ‘वारसा प्रदर्शन’ आणि ‘व्ही आर झोन’ (Virtual Reality) द्वारे डबेवाल्यांचा प्रवास प्रभावीपणे सादर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘डबेवाला’ स्वरूपातील स्वतःचे छायाचित्र पाहण्याची सुविधा देखील येथे उपलब्ध असून, महापौरांनी त्याचाही अनुभव घेतला.सुमारे १३५ वर्षांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेली डबेवाल्यांची सेवा ही कौतुकाच्या पलीकडची आहे. संपूर्ण मुंबईत दुपारी ठराविक वेळेत जेवणाचे डबे पोहोचवण्याची ही व्यवस्था लाखो नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहे. वारकरी परंपरेतून प्रेरित होऊन भगवंताचे नामस्मरण करत सुरू असलेली ही सेवा मुंबईला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारी ठरली आहे. डबेवाल्यांचे सांघिक कार्य, वेळेचे अचूक नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती ही व्यवस्थापन शिकणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श आहे, असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.



महापौरांची सह्दयता


दरम्यान, डबेवाला संघटनेचे सदस्य दिनेश आरडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना बुधवारी २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी तातडीने डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी कूपर रुग्णालयात जाऊन श्री. आरडे यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. आरडे यांची प्रकृती आता स्थिर आहे.



नव्या उर्जेने पुन्हा उभी राहिली डबेवाल्यांची सेवा


डबेवाला सेवेची सुरुवात १८९० मध्ये झाली. या सेवेची मुळे वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहेत. सध्या मुंबईत दररोज सुमारे एक लाख डबे वितरित केले जातात; कोविडपूर्व काळात ही संख्या दुप्पट होती. टाळेबंदीच्या काळात मुंबईकरांसह जगभरातून मिळालेल्या मदतीमुळे डबेवाल्यांचा उदरनिर्वाह सुरू राहिला आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला, अशी माहिती डबेवाला संघटनेच्या वतीने माहिती देताना किरण गवांदे यांनी सांगितली. या संकटातून प्रेरणा घेऊन ही सेवा नव्या उर्जेने पुन्हा उभी राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार श्रीकांत भारतीय यांच्या पाठिंब्यामुळे डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहिले, असे नमूद करीत जगभरातून येणारे पर्यटक, विद्यार्थी आणि व्यवस्थापन तज्ज्ञ यांच्यासाठी हे केंद्र माहितीचा मोठा स्रोत ठरत असल्याचेही गवांदे यांनी नमुद केले.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे