इराणच्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू, चौघांची ओळख पटली

वॉशिंग्टन डीसी : इराणने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू झाला. यापैकी चार सैनिकांची ओळख पटली आहे, अशी माहिती पेंटागॉनने दिली आहे. ओळख पटलेल्या सैनिकांचे फोटो आणि त्यांच्याबाबतची संक्षिप्त माहिती पेंटागॉनने जाहीर केली आहे.


ज्या दोन सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही, त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पेंटागॉनने दिली. इराणने कुवेतच्या पोर्ट शुएबा येथील कमांड सेंटरवर ड्रोनने हल्ला केला होता. या हल्ल्यात अमेरिकेच्या सैनिकांचा मृत्यू झाला, असेही पेंटागॉनने सांगितले.


इराणच्या ड्रोन हल्ल्यात मारल्या गेलेल्या सहा पैकी ओळख पटलेल्या चार सैनिकांची नावं अनु्क्रमे कॅप्टन कोडी खोर्क (३५), सार्जंट फर्स्ट क्लास नोआ टिएटजेन्स (४२), सार्जंट फर्स्ट क्लास निकोल अमोर (३९) आणि सार्जंट डेक्लान कोडी (२०) अशी असल्याचे पेंटागॉनने सांगितले. हे चारही सैनिक आयोवामधील आर्मी रिझर्व्ह सस्टेनमेंट युनिटच्या १०३ व्या सस्टेनमेंट कमांडमध्ये होते. लढणाऱ्या सैन्यासाठी अन्न, पाणी, इंधन, दारूगोळा, वाहतूक व्यवस्था आदी मदत पुरवण्याची जबाबदारी आर्मी रिझर्व्ह सस्टेनमेंट युनिटकडे आहे. ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले सैनिक याच आर्मी रिझर्व्ह सस्टेनमेंट युनिटमध्ये कार्यरत होते.


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैनिकांच्या मृत्यूचे वृत्त कळताच शोक प्रकट केला. ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले सैनिक देशसेवा करत होते आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे लष्कराच्यावतीने सांगण्यात आले.

Comments
Add Comment

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले

नेपाळमध्ये सत्तांतरानंतर नवा संदेश; बालेन शाह- मोदी संवादातून संबंध दृढ होण्याचे संकेत

काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी

Nepal News : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांच्या कारवाईत माजी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अटक

नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील

Iran-US-Israel War : इराणने केले अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी (२७ मार्च) अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त

Pakistan embassy in Tehran : तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ धमाके; परिसरात भीतीचे वातावरण

तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना