Israel - Iran War : अमेरिकेचा इराणवर सागरी हल्ला; १७ इराणी जहाजे नष्ट केल्याचा अमेरिकेचा दावा

मध्य-पूर्वेतील महायुद्ध आता जमिनीवरून समुद्रात पोहोचलं आहे. अमेरिकेने इराणला आजवरचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. अमेरिकन सेंट्रल फोर्सच्या कमांडरने एका व्हिडिओ मेसेजद्वारे खळबळजनक माहिती दिली आहे.


त्या माहितीनुसार, अमेरिकेच्या आक्रमक कारवाईत इराणची १७ लष्करी जहाजं आणि एक महाकाय सबमरीन समुद्रातच नष्ट करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे इराणच्या नौदलाचे कंबरडे मोडले असून, संपूर्ण आखातात आता इराणचे एकही जहाज शिल्लक नसल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.


अमेरिकन कमांडरच्या म्हणण्यानुसार, अरबी खाडी, होर्मुझची सामुद्रधुनी आणि ओमानची खाडी या महत्त्वाच्या सागरी मार्गांवरून इराणचे वर्चस्व पूर्णपणे संपवण्यात आले आहे. इराणने आतापर्यंत ५०० हून अधिक बॅलिस्टिक मिसाइल्स आणि २,००० पेक्षा जास्त ड्रोन्स डागूनही अमेरिकेच्या या सागरी हल्ल्यामुळे इराण बॅकफूटवर गेला आहे.


दुसरीकडे, लेबनान सीमेवर रॉकेट हल्ल्यांच्या इशाऱ्यामुळे सायरन वाजू लागले असून नागरिकांना तातडीने बंकरमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


जगाला इंधन पुरवठा करणाऱ्या इराणवर हल्ले झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची आणि पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले

नेपाळमध्ये सत्तांतरानंतर नवा संदेश; बालेन शाह- मोदी संवादातून संबंध दृढ होण्याचे संकेत

काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी

Nepal News : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांच्या कारवाईत माजी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अटक

नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील

Iran-US-Israel War : इराणने केले अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी (२७ मार्च) अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त

Pakistan embassy in Tehran : तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ धमाके; परिसरात भीतीचे वातावरण

तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना