BMC News : मुंबईतील १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी होणार अर्ज सादर

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड


भाजपच्या करिष्म्याकडे सर्वांचे लक्ष


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या वैधानिक समित्या असलेल्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी ०४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर केले जाणार आहेत. तर या सर्व प्रभाग समित्यांच्या निवडणूका तीन टप्प्यात म्हणजे गुरुवारी, शुक्रवारी आणि येत्या सोमवारी होणार आहेत. या तिन्ही टप्प्यातील निवडणुकांमध्ये महापौर आणि उपमहापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहे. एक ते दोन प्रभाग समिती वगळता उर्वरीत सर्व ठिकाणी बिनविरोधच निवडणूक प्रक्रिया पार पडली जाण्याची शक्यता आहे


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ८९ तर तर शिवसेनेचे २९ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. तर उबाठाचे ६५, मनसेचे ०६ आणि काँग्रेसचे २४ तसेच एमआयएमचे ०८ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अशाप्रकारे नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाल्यामुळे एल प्रभाग समिती अध्यक्षपद हे महायुतीकडे आता येणार आहे. त्यामुळे महायुतीकडे १७ पैंकी ०९ प्रभाग समिती जाणार असून उबाठा मनसे युतीकडे काँग्रेसच्या पाठिंब्यावर सहा प्रभाग समिती राखल्या जाणार आहेत. तर एकमेव एस अँड टी प्रभाग समितीमध्ये महायुतीचे दहा तर उबाठा, काँग्रेस आणि मनसे यांचे दहा असल्यामुळे समसमान सदस्य संख्या आहे. त्यामुळे याठिकाणी जर काँग्रेस किंवा मनसे तटस्थ राहिल्यास भाजपच्या पारड्यात ही समिती पडेल, अन्यथा समसमान सदस्य संख्या असल्यामुळे ईश्वर चिठ्ठीद्वारे या प्रभाग समितीचा अध्यक्ष ठरला जाईल.


मुंबई महापालिकेत सन २०१७मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार मुंबईत उबाठाच्या हाती आठ प्रभाग समित्या होत्या. त्यातील दोन प्रभाग समित्या आता उबाठाला गमवण्याची वेळ आली आहे. तर भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका बजावली असली तरी त्यांच्याकडे ०९ प्रभाग समित्या होत्या. परंतु यावेळी ८९ नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ०९ प्रभाग समित्या महायुतीकडे जावू शकतात.


महाविकास आघाडीकडे जाणाऱ्या सहा पैंकी दोन प्रभाग समित्यांमध्ये काँग्रेसचे जास्त बळ असल्याने उबाठा आणि मनसे तसेच समाजवादी पक्षाच्यावतीने दोन प्रभाग समित्यांवर वर्चस्व असेल. त्यामुळे उबाठाला आपल्या बळावर केवळ चार प्रभाग समिती राखता येणार आहे.


आधी प्रभाग समिती, मग विशेष समित्यांच्या निवडणुका


विशेष म्हणजे सहा विशेष समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक घेतली जायची, तिथे यंदा प्रभाग समिती अध्यक्षपदाची प्रथम आणि त्यानंतर विशेष समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखला गेला आहे.


येत्या गुरुवारी ०५ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती :


सी अँड डी, ए,बी अँड ई, एफ दक्षिण व एफ उत्तर, आर उत्तर व आर मध्य, आर दक्षिण, पी पूर्व व पी पश्चिम


येत्या शुक्रवारी ०६ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती


जी उत्तर, जी दक्षिण, पी दक्षिण, के पश्चिम, के उत्तर व के दक्षिण,


येत्या सोमवारी ०९ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती


एल, एन, एस अँड टी, एम पश्चिम, एम पूर्व


महायुतीकडे राखल्या जाणाऱ्या संभाव्य प्रभाग समित्या : ०९


सी आणि डी, , के पश्चिम, पी दक्षिण, आर दक्षिण, आर उत्तर व आर मध्य, एम पश्चिम, एन विभाग, के उत्तर व के दक्षिण,एल


उबाठा, मनसे, काँग्रेस, सपाकडे या राहतील संभाव्य प्रभाग समित्या: ०६


ए,बी आणि ई, एफ दक्षिण व एफ उत्तर , जी दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व व एच पश्चिम, पी पूर्व व पी पश्चिम


एमआयएमच्या वाट्याला येणारी प्रभाग समिती : ०१


एम पूर्व प्रभाग


ईश्वर चिठ्ठीने काढली जाणारी प्रभाग समिती :०१


एस अँड टी प्रभाग

Comments
Add Comment

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी

आरेतील बेकायदा बांधकामांवर आता 'सॅटेलाईट' नजर; 'नेत्रम' ॲपद्वारे अतिक्रमणांचा होणार बिमोड

पालकमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती; दोषी अधिकाऱ्यांवरही उगारणार बडगा मुंबई : आरे दुग्ध

नोंदणी सेवेतील लायसन्स नूतनीकरणासाठी अलर्ट प्रणाली; माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत होणारे आधार-आधारित व्यवहार भविष्यात खंडित होऊ नयेत,

यवतमाळ आश्रमशाळा विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी कारवाई; संस्थेला'कारणे दाखवा' नोटीस; आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यू

नाशिक म्हाडाच्या २० टक्के घरकुल योजनेतील कारभाराचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा दोनशेपेक्षा अधिक विकासकांवर गुन्हे मुंबई :  नाशिक शहरात

मुंढवा जमीन चौकशी अहवाल विधानसभेत सादर; महसूलमंत्री बावनकुळे यांनी केले निवेदन

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मुंढवा येथील सर्व्हे क्र. ८८ मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या कथित अनियमिततेची