नोंदणी सेवेतील लायसन्स नूतनीकरणासाठी अलर्ट प्रणाली; माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत होणारे आधार-आधारित व्यवहार भविष्यात खंडित होऊ नयेत, यासाठी राज्य सरकार आता अत्याधुनिक 'सॉफ्टवेअर-आधारित अलर्ट प्रणाली' कार्यान्वित करणार आहे. नोंदणी सेवेतील लायसन्स कालबाह्य होण्यापूर्वीच प्रशासनाला सावध करणारी ही यंत्रणा असेल, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार निरंजन डावखरे यांनी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.



तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण काय?


राज्यात अलीकडच्या काळात नोंदणी सेवांमध्ये दोन टप्प्यांत एकूण १४ दिवस तांत्रिक अडथळा निर्माण झाला होता. या विलंबाबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री शेलार म्हणाले की, युआयडीएआयकडून (UIDAI) मिळणाऱ्या लायसन्सचे नूतनीकरण वेळेत झाले नव्हते. ज्या अधिकाऱ्यावर या नूतनीकरणाची जबाबदारी होती, त्यांच्यावर इतर एका प्रकरणात विभागीय कारवाई सुरू असल्याने या प्रक्रियेत विलंब झाला. मात्र, ही परिस्थिती लक्षात येताच तातडीने कार्यवाही करून लायसन्सचे नूतनीकरण करण्यात आले असून सर्व सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.


अशा तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आता मानवी चुकांवर विसंबून न राहता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. नवीन अलर्ट प्रणालीमुळे लायसन्स संपण्यापूर्वीच संबंधित विभागाला सूचना मिळेल, जेणेकरून नूतनीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येईल. या निर्णयामुळे राज्यातील दस्त नोंदणी आणि आधार-आधारित व्यवहार अधिक पारदर्शक आणि गतिमान होतील, असा विश्वास मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी सहकुटुंब ओढला श्रीजगन्नाथांचा रथ

मुंबई : भगवान श्रीजगन्नाथांच्या पवित्र रथयात्रेचे औचित्य साधून इस्कॉन, जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या

BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुंबई : मुंबई

Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त