यवतमाळ आश्रमशाळा विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी कारवाई; संस्थेला'कारणे दाखवा' नोटीस; आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. या घटनेत शाळेचा निष्काळजीपणा समोर आला असून, संबंधित संस्थेची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये, याबाबत 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज विधान परिषदेत दिली.



नेमके प्रकरण काय?


मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी कु. दिपाली कोमटी हिचा जिल्हा सामान्य रुग्णालय, यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर आयुक्त, आदिवासी विकास (अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विद्यार्थिनी आजारी असताना तिला वेळेवर योग्य उपचार मिळवून देण्यात शालेय प्रशासनाकडून गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा झाल्याचे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.



शासनाकडून कडक कारवाईचे संकेत


आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आणि देखरेखीबाबत अनेक त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री डॉ. उईके यांनी सभागृहात सांगितले की, संबंधित संस्थेला त्यांची मान्यता रद्द करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. तसेच, शाळेच्या दैनंदिन कामकाजात पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तिथे तात्काळ 'प्रशासक' नेमण्यात येणार आहे. पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आधीच वितरित करण्यात आले आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या