मुंढवा जमीन चौकशी अहवाल विधानसभेत सादर; महसूलमंत्री बावनकुळे यांनी केले निवेदन

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मुंढवा येथील सर्व्हे क्र. ८८ मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत यासंदर्भात अधिकृत निवेदन केले. अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल तयार केला असून, तो आता विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.


पुण्यातील मुंढवा येथील सर्व्हे क्र. ८८ मधील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांत मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय आणि कायदेशीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने सखोल चौकशी करून आपला अहवाल १२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य शासनास सादर केला होता. तो आज सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्याबरोबरच हा अहवाल महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://rfd.maharashtra.gov.in येथे उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही स्पष्ट केले.

Comments
Add Comment

जीएसटी' मध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

९ वा वस्तू व सेवा कर दिवस समारंभ मुंबई: देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर संकलन करण्यामध्ये महाराष्ट्र हे

Powai Lake Overflowing : आनंदवार्ता! मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला; पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे

Mumbai Rains Traffic : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसाने शहर ठप्प; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम उपनगरात

Walkeshwar Accident : वाळकेश्वरमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बाबुलनाथ रोडवरील दुर्घटना

मुंबई : वाळकेश्वर (Walkeshwar) परिसरातील बाबुलनाथ रोड (Babulnath Road) येथील सूर्यप्रकाश इमारतीत (Surya Prakash Building) मंगळवारी (३० जून) रात्री

Vijaya Mehta : मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी दिशा आणि असंख्य गुणी कलाकार देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका (Theatre Director)

BMC : रस्ते विकासकामे झाडांच्या मुळांवर

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची कामे जोरात असून ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे