बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला अजित पवारांचे नाव

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांच्या नावाने करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.


वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या ३ जानेवारी २०१३ च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २० जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयही सुरू करण्यात आले.


या दोन्ही संस्था ग्रामीण व अर्धनगरी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्यकेंद्र ठरली आहेत. येथे विशेषज्ञ वैद्यकीय सेवा, आपत्कालीन उपचार, शस्त्रक्रिया सुविधा तसेच आयुर्वेद उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होत आहेत. परिणामी, पुणे शहरावरील तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा ताण कमी होऊन परिसरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व परवडणारी सेवा मिळत आहे.


यापूर्वी ३१ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीचे नामकरण “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती” असे करण्यात आले होते. आता त्याच अनुषंगाने शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे नामकरण “स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती” असे करण्यात येणार आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामती व शासकीय आयुर्वेद रुग्णालय, बारामती यांचे नामकरण अनुक्रमे “स्व. अजित (दादा) पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती” असे करण्यात येणार आहे.


दिवंगत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच विविध विभागांचे मंत्री म्हणून कार्य करताना राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले होते. जिल्हास्तरीय वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयांची स्थापना, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि ग्रामीण भागात तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा विस्तार या बाबींमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे बारामती परिसरातील आरोग्य व शैक्षणिक विकासाला गती मिळाल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


नामाधिकरणानंतर संबंधित संकेतस्थळे, अभिलेखे, नोंदवही, फलक, अधिकृत पत्रव्यवहार व इतर कागदपत्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबईचे आयुक्त तसेच संबंधित संस्थांचे अधिष्ठाता यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका