आरक्षणाच्या पेचामुळे रखडलेल्या निवडणुका २०२७ मध्ये होणार ?

मुंबई : महाराष्ट्रातल्या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषदांच्या तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका या रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या कोणत्याही जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यास स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे निवडणुका रखडल्या आहेत. पेच सुटला तरी या निवडणुका घेण्यास आता थेट २०२७ उजाडण्याची शक्यता आहे.


न्यायालयाच्या या भूमिकेमुळे राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ग्रामीण राजकारणात मोठी शांतता पसरली आहे. जोपर्यंत ५० टक्के आरक्षण मर्यादेचा कायदेशीर पेच सुटत नाही, तोपर्यंत या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासकांचेच वर्चस्व राहणार आहे. राज्य शासनाने नवा जीआर काढून ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक, सरपंच या पदांवर आधीपासून कार्यरत असलेल्यांनाच प्रशासक म्हणून नेमणूक दिली आहे. पुढील निवडणूक होऊन विजयी व्यक्तींनी पदभार स्वीकारेपर्यंत आधीचे ग्रामसेवक, सरपंच हेच प्रशासक म्हणून काम करतील. यामुळे ग्रामीण प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक प्रश्नांची जाण असलेली व्यक्ती उपलब्ध होईल तसेच ग्रामीण विषय हाताळण्यात कोणताही अडथळा किंवा अडचण येणार नाही, असा विश्वास राज्य शासनाने व्यक्त केला आहे


राज्यात १ एप्रिल २०२६ पासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होत आहे, जे ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. या जनगणनेचा अहवाल सादर होण्यास आणखी तीन महिने लागतील. लोकसंख्येचा नवीन डेटा न्यायालयात सादर झाल्यानंतरच निवडणुकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे आरक्षणाच्या पेचामुळे रखडलेल्या २२ जिल्हा परिषदांच्या तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका २०२७ च्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित