इराणच्या नौदलाची नऊ जहाजं बुडवली, ट्रम्पचा दावा

वॉशिंग्टन डीसी : ताज्या हल्ल्यात इराणची किमान नऊ जहाजं बुडवण्यात यश मिळाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन केला आहे. बुडवलेल्या जहाजांपैकी काही तुलनेने मोठी आणि महत्त्वाची आहेत; असेही ट्रम्पनी सांगितले. इराणच्या नौदलाच्या मुख्यालयाचे अंशतः नुकसान करण्यात अमेरिका यशस्वी झाल्याचाही दावाही ट्रम्प यांनी केला आहे. याआधी सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) ओमानच्या आखातातील एका बंदरात इराणी युद्धनौका बुडवल्याचे जाहीर केले आहे.



इराणच्या काही जहाजांचा पाठलाग अमेरिका करत आहे. लवकरच इराणची आणखी काही जहाजं समुद्रतळाशी असतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यावर अद्याप इराणची प्रतिक्रिया समजलेली नाही.


अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे किमान ४८ महत्त्वाचे नेते मारले गेले आहेत. हा इराणसाठी मोठा धक्का असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराण विरूद्धच्या लष्करी कारवाईला मोठे यश मिळत असल्याचे ट्रम्प यांनी फॉक्स न्यूज या अमेरिकेतील वृत्तवाहिनीला सांगितले. इराणमध्ये नेतृत्व बदल करणे आणि इराणचे सैन्यबळ नष्ट करणे, इराणकडे असलेले आण्विक सामर्थ्य निकामी करणे हाच अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती ट्रम्प यांनी फॉक्स न्यूज या अमेरिकेतील वृत्तवाहिनीला दिली. जगात शांतता नांदावी तसेच जगाची सुरक्षा अबाधित रहावी यासाठी इराण विरुद्धची कारवाई आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.



Comments
Add Comment

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेच्या अपयशासाठी इराणने अमेरिकेला धरले जबाबदार

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील निष्फळ झालेल्या चर्चेनंतर, इराणने म्हटले आहे की, वाटाघाटी अजून संपलेल्या नाहीत.

Iran-US Peace Treaty : ४० दिवसांच्या संघर्षाची २१ तास चाललेली चर्चा निष्फळ; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली बहुचर्चित शांती चर्चा अखेर

Iran-US Peace Treaty : अमेरिका-इराणचे शिष्टमंडळ दाखल, इराणच्या चार प्रमुख मागण्या

शस्त्रसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन

Chimpanzees Civil War : सातासमुद्रापार सेंट्रल, वेस्टर्नचा संघर्ष पेटला, एकेकाळी मित्र असलेले घेतायत एकमेकांचा जीव

कंपाला : एकेकाळी एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं राहणारे चिम्पांजी एकेमकांच्या जीवावर उठल्याचा प्रकार घडला आहे.

Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं

Iran-US Peace Treaty : शांतता चर्चेपूर्वी तणाव शिगेला! अमेरिकेच्या 'त्या' कृतीची आठवण करून देत इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल

अमेरिकेसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या शांतता चर्चेसाठी इराणचे ७१ सदस्यीय शिष्टमंडळ शुक्रवारी (१० एप्रिल) उशिरा