Iran-US Peace Treaty : अमेरिका-इराणचे शिष्टमंडळ दाखल, इराणच्या चार प्रमुख मागण्या

शस्त्रसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्रपती जेडी व्हान्स करत आहेत. इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत आहेत. इराणी शिष्टमंडळात ७१ जणांचा समावेशाची माहिती आहे.


इराणच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या माध्यमातून अमेरिकेसमोर चार अशा मागण्या ठेवल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावर संपूर्ण जगाचे अर्थकारण आणि सुरक्षा अवलंबून आहे. दरम्यान, अमेरिकेनेही इराणची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे संकेत देऊन चर्चेची दारे उघडल्याची माहिती आहे.



इराणच्या चार प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे :


गोठवलेली संपत्ती मुक्त करा : कतार आणि इतर विदेशी बँकांमध्ये अडकलेली इराणची अब्जावधींची मालमत्ता त्वरित रिलीज करावी.


लेबनॉनमध्ये युद्धविराम : लेबनॉनमध्ये इस्रायलचे सुरू असलेले हल्ले तातडीने थांबवावेत.


हॉर्मुझवर मर्यादा आणि टॅक्स : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून दिवसाला फक्त १५ जहाजे जातील आणि त्यांच्यावर 'ट्रान्झिट फी' आकारली जाईल.


अमेरिकन सैन्याची माघार : आखाती देशांमधून अमेरिकन सैन्याने पूर्णपणे माघार घ्यावी.


चर्चा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दोन्ही गटांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. शरीफ यांनी आधी इराणचे संसद अध्यक्ष गालीबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वन्स, स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर यांची भेट घेतली. या भेटीवेळी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी हे देखील उपस्थित होते.


या चर्चेच्या गांभीर्यामुळे इस्लामाबाद आणि रावलपिंडीमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आल्याने छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इराणच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्दीत एवाक्स आणि लढाऊ विमानांचे संरक्षण देण्यात आले होते.

Comments
Add Comment

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

Nepal Agniveer Recruitment Rally : ‘आम्हालाही भारतीय सैन्यात भरती करा!’ अग्निवीर योजनेसाठी नेपाळचे हजारो तरुण रस्त्यावर

काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी

Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर

Bashar al-Assad : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष असदना कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

सीरिया : माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचा धाकटा भाऊ महेर असद या दोघांना सीरियातील एका न्यायालयाने

Iran Cyber Attack : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना इराणचे हॅकिंगने उत्तर ? अमेरिकेच्या नागरिकांना हाल हाल करून मारण्याचा इराणचा डाव ?

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण