Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं आहे. विशेष म्हणजे एकीकडे मध्य पूर्व आशियाध्ये युद्ध सुरु असताना असं अचानक त्यांचं या मुद्द्यावर बोलणं तज्ज्ञांना विचार करायला भाग पाडत आहे.


पत्रकारांशी बोलताना मेलानिया ट्रम्प (Melania Trump) म्हणाल्या की, “माझ्याविषयी एपस्टिनशी संबंध जोडणारे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि ते तात्काळ थांबले पाहिजेत.” त्यांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांवर नैतिकतेचा अभाव असल्याचा देखील आरोप केला आहे. तसेच, त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा किंवा एपस्टईनची मैत्रीण घिसलेन मॅक्सवेल हिच्याशी माझा कधीही वैयक्तिक संबंध नव्हता. काही सामाजिक वर्तुळात एकाच कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही सामान्य गोष्ट आहे, मात्र त्यातून आमचा काही संबंध होता असं समजणं चुकीचं आहे.



एपस्टिनबद्दल मला काहीच माहिती नव्हती :


मेलानिया यांनी पुढे सांगितले की, त्यांची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी १९९८ मध्ये न्यूयॉर्कमधील एका पार्टीत योगायोगाने भेट झाली. आमच्या त्या भेटीसी एपस्टिनचा कोणताही संबंध नव्हता. एपस्टिनशी माझी पहिली भेट २००० साली एका कार्यक्रमात झाली, मात्र त्याच्या गुन्ह्यांविषयी किंवा पार्श्वभूमीबद्दल मला कोणतीच कल्पना नव्हती.



डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आरोपांनाही दिले उत्तर :


पत्रकारांशी बोलताना फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी आपल्या पतीवर म्हणजेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरही उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या कि; डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव कोणत्याही अधिकृत दस्तऐवज, पीडितांच्या साक्षी किंवा एफबीआयच्या चौकशीत आलेले नाही. तसेच, ट्रम्प कधीही एपस्टिनच्या खासगी बेटावर किंवा विमानातही गेले नाहीत.

Comments
Add Comment

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

Nepal Agniveer Recruitment Rally : ‘आम्हालाही भारतीय सैन्यात भरती करा!’ अग्निवीर योजनेसाठी नेपाळचे हजारो तरुण रस्त्यावर

काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी

Pakistan GHQ : रावळपिंडीत पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळीबार; गोळीबार करणारा बंदूकधारी ठार

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर

Bashar al-Assad : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष असदना कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

सीरिया : माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचा धाकटा भाऊ महेर असद या दोघांना सीरियातील एका न्यायालयाने

Iran Cyber Attack : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना इराणचे हॅकिंगने उत्तर ? अमेरिकेच्या नागरिकांना हाल हाल करून मारण्याचा इराणचा डाव ?

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण