Israel vs Iran War Ali Khamenei Death: मोठी अपडेट, इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू; इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला दावा बेंजामिन नेतान्याहू

दिल्ली: जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाबाबत महत्तवाची अपडेट समोर आली. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला. तसंच खामेनी यांचा मृतदेह देखील सापडल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयांजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसंच त्यांच्या घराजवळ बंकर बस्टिंग क्षेपणास्त्र डागण्यात आलं. त्यामुळे खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी केला.


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या घोषणेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला. इराणेचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इतिहासातील अत्यंत वाईट व्यक्तींमधील एक असलेल्या खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. खामेनी यांचा मृत्यू हा केवळ इराणी जनतेसाठीच नाही तर अमेरिकन नागरिकांसह जगभरातील पीडितांसाठी न्याय असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच, इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची ही एकमेव मोठी संधी आहे. असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.


दरम्यान इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणनं फेटाळला आहे. तसंच खामेनी इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला खोटा दावा हा इराणच्या नेत्याची हत्या करण्याच्या त्यांच्या कटाचा एक भाग असल्याचं इराणनं म्हटलं आहे.



इराणवरील हल्ल्याचे कारण?


२०२५ मध्ये इराण-इस्त्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्त्रायच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार करू देणार नाहीत. परंतु, इराणने अशा कोणत्याही गोष्टींना जुमानले नाही. इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही, असे दिसताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात