अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. लढाई सुरू झाल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत किंवा पुढे ढकलण्यात आली आहेत. विमानांच्या वेळापत्रकात झालेल्या या बदलामुळे अनेक विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. या घडामोडींचा परिणाम आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या आयोजनावरही दिसू लागला आहे.


आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार आता सुपर आठ फेरीचे शेवटचे दोन सामने उरले आहेत. यातील पहिला सामना रविवारी १ मार्च रोजी दुपारी तीन वाजता झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तर दुसरा सामना याच दिवशी संध्याकाळी सात वाजता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. हे दोन्ही सामने भारतात आहेत. यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सेमी फायनल आणि ८ मार्च रोजी फायनल असे एकूण तीन सामने होणार आहेत. हे सामने पण भारतात होणार आहेत. यामुळे वर्ल्डकपशी संबंधित सर्व खेळाडू तसेच आयसीसीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आता भारतातच वेगवेगळ्या शहरांमध्ये विमानांतून प्रवास करायचा आहे. भारताबाहेर स्पर्धेचा आता एकही सामना खेळवला जाणार नाही.


सुरू असलेल्या लढाईमुळे भारतातल्या देशांतर्गत विमान वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. यामुळे वर्ल्डकपच्या आयोजनात कोणताही अडथळा येणार नाही. पण आव्हान संपलेल्या संघांना तसेच स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीच्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांना आपापल्या देशात जाण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. ही शक्यता विचारात घेऊन आयसीसीने विविध आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी संपर्क साधला आहे. प्रवास सुरक्षितरित्या व्हावा यासाठी नियोजन केले आहे. आयसीसीने यासाठी एक ट्रॅव्हल सपोर्ट डेस्कही सक्रिय केला आहे. त्यामुळे खेळाडू तसेच आयसीसीचे अधिकारी - कर्मचारी यांची गैरसोय दूर केली जाईल.


सुपर एट फेरीतले ग्रुप दोनचे सर्व सामने झाले आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र झाले आहेत. ग्रुप एकमधून दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी पात्र झाली आहे. झिम्बाब्वे विरुद्धचा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ धावगती सुधारण्यास उत्सुक आहे. तर भारत आणि वेस्ट इंडिज हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. विजेता संघ सेमी फायनल खेळणार आहे आणि हरणाऱ्याचे स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. यामुळे या सामन्यात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची