BMC : मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुंबई : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.



स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर (पूर्व) परिसरातील पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदान येथे भेट दिली. महापौर तावडे यांनी हातात कुंचला घेत कॅनव्हासवर चित्र रेखाटले. माटुंगा येथील फाईव्ह गार्डन मध्ये शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.



ग्रँट रोड ( पश्चिम ) येथील ऑगस्ट क्रांती मैदानात महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट दिली. तसेच, वांद्रे परिसरातील एमआयजी क्लब येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.



यावेळी उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Law Admission Update : 16 कॉलेजांना 100% प्रवेशाची परवानगी; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या विधि प्रवेश (Law Admission 2026) प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक

Central Railway Mega Block : शीव आरओबीच्या कामासाठी माटुंगा-कुर्ला दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; लोकल व एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मि

Amit Shah : देशातील नागरी सहकारी बँकाचे मुख्यालय मुंबईत; केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा

दिल्लीहून मुंबईत कार्यालयाचे स्थलांतर होणार https://prahaar.in/2026/08/08/jalgaon-accident-news-four-people-narrowly-escaped-an-accident/ मुंबई : देशातील नागरी सहकारी

Devendra Fadnavis : सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळ्याची चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पाच वर्षांतील देणगी आणि दान संकलनाची तसापणी

Mumbai Metro Good News : मुंबईकरांना मोठा दिलासा! अंधेरी-घाटकोपर मार्गावर १० ऑगस्टपासून 'मिक्स्ड-लूप' सेवा; गर्दीच्या वेळी ३ मिनिटांत मेट्रो!

मुंबईतील सर्वात वर्दळीच्या वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (मेट्रो १) (Andheri to Ghatkopar Metro 1) मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो

IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)