अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई


मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे विनापरवाना आणि नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध रविवार १ मार्चपासून राज्यव्यापी तीव्र मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.


विधान भवनात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. "अवैध वाहतुकीमुळे केवळ नियमांचे उल्लंघन होत नसून, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. फिटनेस प्रमाणपत्र, विमा आणि परवाना नसलेली वाहने रस्त्यावर धावणे हे अपघातांना निमंत्रण देणारे आहे," असे सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.


अवैध वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची भरती केली जाते. अशा वाहनांचा विमा नसल्याने अपघात झाल्यास पीडितांना कायदेशीर मदत किंवा नुकसानभरपाई मिळणे दुरापास्त होते. अनेकदा वाहन चालक किंवा मालक पसार होऊन जबाबदारी टाळतात, ज्यामुळे प्रवाशांचे कुटुंब उघड्यावर पडते, अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली.



एसटीच्या हिताचा निर्णय


राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाला या अवैध वाहतुकीचा मोठा फटका बसत आहे. एसटीसमोर खासगी अवैध वाहतूकदारांनी आर्थिक आव्हान उभे केले आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडत असून अधिकृत सेवा आर्थिक संकटात सापडल्या आहेत. प्रवासी संख्या घटल्याने अनेक मार्गांवरील एसटी फेऱ्यांच्या नियोजनावर विपरित परिणाम होत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.


 अवैध वाहतुकीमुळे प्रवाशांची कोणतीही नोंद नसते. याचा फायदा घेऊन मानवी तस्करी किंवा लुटमारीसारखे गुन्हे घडू शकतात. तपासाच्या वेळी अशा वाहनांचा तपशील मिळत नसल्याने यंत्रणांपुढे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हा सामाजिक सुरक्षेचाही प्रश्न आहे, असे मतही सरनाईक यांनी मांडले. रस्त्यावरील वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि बेदरकार ड्रायव्हिंग रोखण्यासाठी मोटार परिवहन विभागाने केवळ दंड न आकारता कठोर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन आणि पारदर्शक परवाना प्रक्रिया राबवून कायदेशीर वाहतुकीला प्रोत्साहन देण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला.

Comments
Add Comment

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना