अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क साधण्याबरोबरच अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल फोन हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे मोबाईलला नेटवर्क असणं खुप गरजेचं झालं आहे. कॉल करणे, मेसेज पाठवणे, इंटरनेटचा वापर करणे या सर्व गोष्टी फोनवरच अवलंबून आहेत. मात्र, काहीवेळी अचानकच फोनचं नेटवर्क गायब होतं. त्यामुळे काहीवेळा ‘No Service’/ ‘Emergency Calls Only’ असं फोनवर दिसतं. ही खुप सामान्य समस्या आहे. पण लोकांना वाटतं की, कंपनीच्या चूकीमुळे ही गोष्ट घडते.


याबाततची काही कारणं ही नेटवर्कशी संबंधित असतात तर काही फोन किंवा सिमशी संबंधित असतात. तसेच, आपल्या लोकेशनशीही संबंधित असतात.
याबाबतच सर्वात मोठं कारण म्हणजे सिग्नल पोहोचण्यात अडचण येत असल्यानं देखील या गोष्टी घडतात.


या समस्येचे सर्वात मोठे कारण म्हणजे सिग्नल कमकुवत असणे आहे हे देखील असू शकतं.


काहीवेळा सण-उत्सवात, मॅच किंवा मोठ्या इव्हेंट दरम्यान अनेकजण एकाच टॉवरशी कनेक्ट होतात. यामुळे नेटवर्क ओव्हरलोड होतं आणि सिग्नल अचानक खाली येतं. तसेच, भारतात यूझर्सची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे मोठी शहरं किंवा ऑफिसच्या परिसरात ही समस्या समान्य आहे.


तुम्ही राहत असलेला परिसर टॉवरपासून खुप दूर असेल किंवा टॉवरवर मेंटेनेंस/रिपेयरचं काम सुरू असेल तर यावेळी नेटवर्क अचानक गायब होते. कधी-कधी नेटवर्क स्विचमध्ये प्रॉब्लम असल्यामुळेही ही समस्या उद्भवते. 5G एरियामध्ये 5G सिग्नल कमकुवत झालं तर फोन ऑटोमॅटिक 4G वर शिफ्ट होऊ शकत नाही आणि यामुळं नेटवर्क जातो.



सिम कार्ड जुनं असणे, खराब, लूज किंवा डॅमेज असेल तरीही नेटवर्क अचानक गायब होतं. सिम काढून स्वच्छ करुन पुन्हा बसवा किंवा दुसऱ्या स्लॉटमध्ये ट्राय करा. तुम्हाला सिम स्वॅपिंग किंवा अॅक्टिव्हेशन प्रॉब्लम असेल तरीही असं होण्याची शक्यता असते.


नेटवर्क अचानक गेल्यावर 'या' गोष्टी करा
लोकेशन बदलून पाहावं किंवा फोन रिस्टार्ट करावा. तसेच, एयरप्लेन मोड 10-15 सेकंदांसाठी ऑन-ऑफ करून पाहावं.
मोबाईल डेटा आणि नेटवर्क मोडदेखील चेक करावा.
तसेच, सिम काढून पुन्हा बसवा किंवा दुसऱ्या फोनमध्ये ट्राय करा.
वारंवार असं होत असल्यास नेटवर्क कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा किंवा सॉफ्टवेअर अपडेट चेक करून पाहा.


या समस्या घरबसल्याही दुरुस्त करता येतात. पण जर या समस्या सतत उद्भवत असतील तर कंपनीकडून टॉवर इश्यू किंवा तुमच्या परिसरात कव्हरेज कमी असल्यामुळेदेखील हे घडू शकतं. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेतल्यास हा प्रॉब्लम दूर होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.