दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन वर्षापूर्वी हिरकणी बसच्या ४४४ बस फेऱ्या धावत होत्या. तर, आता या फेऱ्यांची संख्या ९७ पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे ७८ टक्के फेऱ्यांची घट झाली आहे. हिरकणीसह शिवशाही, शिवनेरी बसच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत.


एसटी महामंडळाद्वारे चालविण्यात येणाऱ्या दादर-पुणे हिरकणी बससेवेच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याची माहिती समोर आली आहे. दादर स्थानकातून पुण्याकडे धावणाऱ्या या बससेवेवर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी अवलंबून असतात; परंतु बसगाड्यांची कमतरता, चालक-वाहकांची अपुरी उपलब्धता, देखभाल आणि तांत्रिक अडचणी, कमी प्रवासी प्रतिसाद असलेले वेळापत्रक या कारणांमुळे फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.


सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत बस कमी असल्याने प्रवाशांना खासगी वाहन किंवा रेल्वेचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावल्या, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या