पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पाडा आणि पी अँड टी कॉलनी परिसरात मागील तब्बल २५ दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याच्या निषेधार्थ शेकडो महिला-पुरुष नागरिकांनी आज सकाळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.


नांदिवली पाडा, पी अँड टी कॉलनीसह साई दर्शन नक्स १, साई दर्शन नक्स, साई दर्शन, बालाजी, गुरू दर्शन, लक्ष्मण निवास आदी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प आहे. यापूर्वी काही दिवस अत्यल्प दाबाने पाणी येत होते; मात्र गेल्या २५ दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या पाणीटंचाईमुळे महिला, वृद्ध, लहान मुले यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पाणी हा मूलभूत हक्क असून नियमित पुरवठा मिळणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


महापालिकेकडून ५०० रुपये आकारून टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. मात्र हे पाणी अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक असल्याने अनेक नागरिक व लहान मुले आजारी पडल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात दीड महिना परिसरात फूल प्रेशरने पाणी मिळत होते. मात्र निवडणूक संपताच पाणीपुरवठा कमी झाला आणि अखेर बंदच झाला. “हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का?” असा गंभीर सवाल नागरिकांनी उपस्थित केला.


मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मळेकर यांनी सांगितले की, संबंधित भाग शहराच्या टोकाला असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा दाब वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सध्याच्या घडीला टँकरमार्फत पाणीपुरवठा करून नागरिकांची तात्पुरती गरज भागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी या मोर्चात राजाराम कोचरेकर, गिरीश गावकर, संदेश नारकर, संजय परब, अमोल राउत, अमित पवार, सुहास गावडे, संकेत गांगण आदींसह रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले

ठाण्यात पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; ३० एप्रिलपर्यंत काही मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे