Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील एल आल्टो शहरात बोलिव्हियन वायुसेनेचे हरक्युलिस C-१३० हे अजस्र विमान अपघातग्रस्त झाले. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६ च्या सुमारास हा अपघात झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. लँडिंग किंवा टेक-ऑफच्या प्रक्रियेदरम्यान विमानावरचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीवरून वेगाने बाहेर घसरले. विमानाचा वेग इतका जास्त होता की, त्याने विमानतळाची मजबूत सीमाभिंत (Boundary wall) क्षणात तोडली आणि ते थेट जवळच्या सार्वजनिक रस्त्यावर जाऊन कोसळले. या अनपेक्षित संकटामुळे रस्त्यावरील नागरिकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. रस्त्यावर कोसळल्यानंतर हे महाकाय विमान तेथून जाणाऱ्या अनेक कार आणि इतर वाहनांवर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की अनेक वाहने विमानाखाली चिरडली गेली असून त्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.



रस्त्यावर नव्या कोऱ्या चलनी नोटांचा खच


 

या भीषण विमान अपघातानंतर एक अत्यंत धक्कादायक दृश्य समोर आले आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, हे हरक्युलिस C-130 विमान देशाच्या विविध दुर्गम भागांत नव्या चलनी नोटा पोहोचवण्याचे काम करत होते. अपघाताच्या तीव्रतेमुळे विमानातील साठा रस्त्यावर विखुरला गेला. दुर्घटनेनंतर रस्त्यावर सर्वत्र चलनी नोटांचा खच पडलेला पाहायला मिळाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचे व्हिडिओ चित्रण केले असून, नोटा विखुरल्याचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहेत. स्थानिक मीडिया संस्था 'युनिटेल'ने बोलिव्हियाच्या संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत या माहितीला दुजोरा दिला आहे. हे लष्करी विमान सांता क्रूझ शहरातून उडाले होते आणि चलनाचा पुरवठा करण्यासाठी ते एल आल्टोच्या दिशेने जात होते. दुर्दैवाने, धावपट्टीवरून घसरल्यानंतर हे विमान सरळ रस्त्यावर आले आणि हा मोठा अनर्थ घडला. या विमानाचा उद्देश देशाच्या अंतर्गत भागांत आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी रोख रक्कम पोहोचवणे हा होता. या भीषण दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून एल आल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. राष्ट्रीय विमान कंपनी 'बोलिव्हियाना डी एव्हिएशन'ने अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केले की, अपघातग्रस्त विमान त्यांच्या कंपनीच्या ताफ्यातील नव्हते, तर ते वायुसेनेचे लष्करी विमान होते. सध्या संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून विखुरलेल्या चलनाचा ताबा घेण्याचे काम प्रशासन करत आहे.
Comments
Add Comment

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील