अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,००० किलोमीटर लांबीचा पावसाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मार्च महिन्यातच मे महिन्यासारखी उष्णता अनुभवणाऱ्या जनतेला दिलासा मिळणार आहे.


हवामान तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे पश्चिमी चक्रावात किंवा विक्षोभ हे वक्राकार असतात. मात्र, यंदाचा हा कमी दाबाचा पट्टा एका सरळ रेषेत असून तो हजारो किलोमीटरपर्यंत पसरला आहे. अशा प्रकारची सरळ रचना अत्यंत दुर्मीळ मानली जाते. या रचनेमुळे ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा यांसह वादळी पावसाची निर्मिती होत आहे, ज्याचा अनुभव सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये येत आहे. पश्चिमी विक्षोभ साधारणपणे हिवाळ्याच्या काळात पश्चिम दिशेकडून पाऊस आणि बर्फवृष्टी घेऊन येतात. ही हजारो किमी मार्गावर सरळ रेषेत पसरलेली नवी प्रणाली तिच्या वेगळ्या आकारामुळे आणि यंदा मार्चमध्येच तापलेल्या प्रदेशांना काही प्रमाणात दिलासा देणारी ठरू शकते. एरवी वक्राकार असणारी ही प्रणाली इतक्या मोठ्या अंतरापर्यंत सरळ रेषेत असणे हे वातावरणातील 'जेट स्ट्रीम' मधील बदलांमुळे असू शकते. हवामान बदलाचा संकेतही मानण्यात येत आहे.


काही दिवसांपूर्वी दिल्लीसह उत्तर भारतात पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. ऐन मार्चमध्येच उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, या चक्रावाताच्या आगमनामुळे तापमानात ३ ते ७ अंशांची मोठी घट झाली असून वातावरणात गारवा पसरला आहे. या आगळ्यावेगळ्या विक्षोभाच्या परिणामी पडणारा पाऊस, वादळी वारे आणि विजेचा कडकडाट पाहता सावधगिरी बाळगावी, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी