अलिबाग नगरपालिकेचा १६१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य : नगराध्यक्षा अक्षया नाईक


अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १६०.८४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. एकूण अपेक्षित खर्च १६०.७४ कोटी असून, दहा लाखांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. कोणतीही करवाढ नसणारा आणि विकासकामांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी सांगितले.


एकूण १६०.८४ कोटींपैकी सुमारे ११० कोटी भांडवली अनुदान यातून प्राप्त होणार असून, उर्वरित अंदाजे यातून ३० कोटी घरपट्टी, पाणीपट्टी व इतर घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी, विशेषतः शासकीय थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने ती वसूल करण्याच्या सुचना सभासदांनी सभेत केल्या. नमो उद्यान व वैशिष्ट्यपूर्ण कमान प्रकल्पासाठी ४० कोटी निधी अपेक्षित आहे. हिराकोट तलाव परिसरात नमो उद्यान उभारण्यात येणार असून, शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यावर्षी कंटेनर आधारित अत्याधुनिक मत्स्यालय (अॅक्वेरियम) हा अलिबागच्या पर्यटन विकासात भर घालणार प्रकल्पही पूर्णत्वास जाणार आहे. विविध विकासकामांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कचरा व्यवस्थापन ३.३ कोटी, जंतुनाशक फवारणी ४२ लाख, गटार व नालेसफाई ५० लाख, मोकाट श्वाननियंत्रणासाठी २० लाख, एलईडी पथदिवे १५ लाख, खडे भरणे २० लाख, स्मशानभूमी देखभाल २० लाख, उघडी गटारे बांधकाम एक कोटी, उद्यान देखभाल व दुरुस्ती ३५ लाख, स्वच्छतागृह निर्मिती, दुरुस्ती २० लाख, तसेच आंग्रे समाधी सुशोभीकरण कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद दाखविण्यात आली आहे.


मागासवर्गीय दुर्बल घटकांसाठी २५ लाख, महिला व बालकल्याणासाठी २५ लाख, तसेच अंध व दिव्यांगांसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या सभेत सर्व सभापती व नगरसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध सुचना मांडल्या. नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि बांधकाम सभापती प्रशांत नाईक बोलताना प्रशासकीय कालखंडानंतर आता लोकनियुक्त प्रतिनिधींनी कार्यभार स्वीकारला असून, शहरातील समस्यांची पूर्ण जाणीव आहे. शासनाकडे पाठपुरावा करून राज्य व केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून शहराचा विकास बॅकलॉग भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल
असे सांगितले.



पाणीपुरवठा, मलनिस्सारणावर भर


शहरातील पाणी योजनेवरील खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्याची बाब मुख्याधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. ही तूट कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. भुयारी गटार योजना, नगरोत्थान महाभियान व वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुमारे ५८ कोटी निधी अपेक्षित असून, त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच भुयारी गटार योजनेमुळे मलनिस्-सारणाचे प्रश्न मार्गी लागतील, असा दावा करण्यात आला आहे.



निधीची कमतरता पडू देणार नाही : प्रशांत नाईक


बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मागील चार वर्षांच्या प्रशासकीय कालखंडानंतर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकासातील बॅकलॉग आम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. रस्ते व विशेष रस्ता अनुदानातून मिळणाऱ्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाला प्राधान्य दिले जाईल, तसेच शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून राज्य व केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त भांडवली अनुदान मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवक-नगरसेविकांचे, तसेच विरोधी सदस्यांचेही सहकार्य घेऊन अलिबागचा विकास वेगाने करण्याचा आमचा निर्धार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

माथेरान पर्यटन स्थळावरील मूलभूत सुविधांचा बोजवारा

सुविधांची पूर्तता करण्यात प्रशासन हतबल माथेरान : पर्यटन नगरी माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असले तरी

उन्हाच्या तडाख्यात डोंगरदऱ्यातील रानमेव्याचा गारवा

करवंदे, कैरी, काजू, बोरांना वाढती मागणी खोपोली  : उन्हाळ्याचे आगमन होताच जंगलात तयार होणारा विविध प्रकारचा