Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनेत्रा पवार यांची निवड एकमुखानं करण्यात आली. याबद्दलची घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केली. पटेल यांनीच पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा राज्यसभेचे उमेदवार म्हणून केली. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान होणार आहे. त्यासाठी ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. महायुतीचं संख्याबळ पाहता ७ पैकी ६ जागा सत्ताधाऱ्यांना जिंकता येतील. यातील ४ जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी १ जागा मिळेल. भाजप आणि शिंदेसेनेनं अद्याप तरी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

दुसरीकडे पार्थ पवार यांचे आजोबा, राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारदेखील राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण त्यांच्या पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही. राष्ट्रवादी शपकडे केवळ १० आमदारांचं बळ आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ३७ मतांची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शपला शिवसेना उबाठा आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागला. या दोन्ही पक्षांकडे मिळून ३६ मतं आहेत.

शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांनीही राज्यसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे. दोन्ही पक्ष राज्यसभेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे शरद पवारांची अडचण वाढली आहे. सध्या राष्ट्रवादी शपचे राज्यसभेत केवळ दोनच खासदार आहेत. त्यात खुद्द शरद पवार आणि फौजिया खान यांचा समावेश आहे. दोघांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेवर न गेल्यास पक्षाचं वरिष्ठ सभागृहातील अस्तित्व संपुष्टात येईल.

सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांनी अद्याप तरी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. पार्थ पवार त्यांच्या जागी राज्यसभेवर जातील, अशी चर्चा होती. सुनेत्रा पवार यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपणार आहे. पण पार्थ पवार त्यांच्या जागी निवडून जाणार नाहीत. २ एप्रिलला ७ जणांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यातील १ जागा पार्थ पवार लढवणार आहेत. त्यामुळे पार्थ पवारांना २०३२ पर्यंतचा कार्यकाळ मिळेल.
Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी