स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन


मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. संसदीय कार्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवावा आणि सभापतींनी हा ठराव एकमताने संमत करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.


या मागणीवर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘‘शासनाला असा प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत असा प्रस्ताव मांडतो आणि त्यानंतर सभापतींनी त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा’’, असे त्यांनी नमूद केले.


गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून केंद्रात आणि राज्यातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर चालणारे सरकार सत्तेत आहे. असे असूनही अद्याप विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळालेला नाही. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वारंवार खंत व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही या विषयावर भाष्य केले होते. आता विधान परिषदेत ही मागणी झाल्याने सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र