देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून २०२६ पासून होणार सुरु

मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील येथे ६०० टन प्रतिदिन महानगरपालिका घन कचऱ्यापासून ७ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाच्या बांधकाम व उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन आता जून २०२६ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विश्वास व्यक्त केला.


मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्प कामांसाठी सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजामध्ये ३६४.६२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५८०.८२ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे.



मुलुंड क्षेपणभूमी येथे जमीन पुनः प्रापण करणे


मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरु असून ३०. जून २०२५ पर्यंत समारे ४८.१३ लाख मेट्रीक एवढ्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तर मार्च २०२६ पर्यंत उर्वरित सुमारे २२ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावून डम्पिंग ग्राऊंडची सुमारे २४ हेक्टर जागा पुनः प्राप्त करण्यात येणर आहे.



देवनार क्षेपणभूमी येथे बायो - सीएनजी प्रकल्प


मुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. सद्यस्थितीत, ५०० टन प्रतिदिन नागरी घन कचऱ्यापर्यंतच्या संबंधीच्या मंजूरीची प्रक्रिया सुरु आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२७पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असल्याचे गगराणी नमुद केले.



बांधकाम व निष्कासन कचरा प्रकल्प


मुंबई महानगरपालिकेने डायघर व दहिसर येथे बांधकाम व निष्कासन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी ६०० टन प्रतिदिन क्षमतेचे दोन प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांतर्गत नोव्हेंबर २०२५ पर्यंत २.३० लाख मे.टन पेक्षा जास्त बांधकाम व निष्कासन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.



देवनार क्षेपणभूमी येथे जैविक-शुद्धीकरण


मुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे १८५ लाख मेट्रीक टन एवढ्या जुन्या साठलेल्या कचऱ्याचे जैव-शुद्धीकरण करण्यासह खोदकामाद्वारे प्रक्रियायुक्त विलगीकरण केलेल्या साहित्याची विल्हेवाट लावून एकूण ११० हेक्टर जागा पुनःप्रापण करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३०३५.५५ कोटी रुपये एवढा इतका असून मार्च २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.



घन कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि तांत्रिक सुधारणा


विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन पध्दतींशी सुसंगत राहण्यासाठी, मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा आणि गोराई येथील कचरा हस्तांतरण केंद्रांचे व्यापक आधुनिकीकरण करण्यात येणार आहे . हे काम जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी