ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही नववा क्रमांक पटकावत सलग दुसऱ्या वर्षी आपले स्थान कायम राखले आहे. सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे, प्रशासनात पारदर्शकता वाढवणे आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे या निकषांवर पालिकेचे मूल्यमापन करण्यात आले.

पुणे येथील पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन (पीआरओ) या संस्थेने राज्यातील २९ महानगरपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक तपासला. सेवा उपलब्धता, प्रशासनातील पारदर्शकता, संकेतस्थळाची उपलब्धता, मोबाईल अॅप, तसेच समाजमाध्यमांचा वापर अशा विविध बाबींचा या सर्वेक्षणात समावेश होता. या सर्व निकषांवर वसई–विरार महानगरपालिकेने ६.४४ गुण मिळवत नववे स्थान मिळवले आहे.

पालिकेने ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करत स्वतःचे स्वतंत्र संकेतस्थळ, मोबाईल अॅप आणि समाजमाध्यमांवरील अधिकृत खाती कार्यान्वित केली आहेत. यामुळे नागरिकांना काही मिनिटांत माहिती मिळणे, तक्रारी नोंदवणे, करभरणा करणे तसेच विविध नागरी सेवांचा लाभ घेणे सुलभ झाले आहे. कोरोना काळानंतर ऑनलाइन सेवा वितरणाचे महत्त्व वाढले असून, शासनाने ई-गव्हर्नन्सला आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक मानले आहे.

विशेष म्हणजे, संकेतस्थळाचा वापर, समाजमाध्यमांवरील सक्रियता आणि पारदर्शकता या विभागांत वसई–विरार महानगरपालिकेला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. सलग दोन वर्षे नवव्या क्रमांकावर कायम राहिल्याने पालिकेच्या डिजिटल प्रशासनाची दखल घेतली जात असून, आगामी काळात या क्रमांकात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय