...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती +५,३५०) पहिल्या, दक्षिण आफ्रिका (धावगती +३,८००) दुसऱ्या, भारत (धावगती -३,८००) तिसऱ्या आणि झिम्बाब्वे (धावगती -५.३५०) चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना १०७ धावांनी तर दक्षिण आफ्रिकेने भारताविरूद्धचा सामना ७६ धावांनी जिंकला आहे. आता गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि भारताने त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला तर भारताच्या सेमी फायनल खेळण्याच्या आशा जिवंत राहतील. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध जिंकल्यानंतर रविवार १ मार्च रोजी वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच पण जिंकावी लागेल. वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव तसेच भारताचा झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन संघांविरुद्ध विजय झाला तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये खेळू शकेल. यातील एखादा निकाल वेगळा लागला तरी भारताचे सेमी फायनल खेळण्याचे स्वप्न धूसर होण्याची शक्यता आहे.


टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाची हीदेखील इच्छा असेल की, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर ८ मधील आपले सर्व सामने जिंकावेत, अन्यथा गणित बिघडू शकते. भारताने याआधी २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप जिंकला होता.

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या