सरकारी योजनांचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांचा होणार गौरव

मुंबई : विविध योजनांमधून महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या रुग्णसेवांवरील खर्चाच्या प्रतिपूर्तीकरिता शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून जे रुग्णालय जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिपूर्तीची रक्कम प्राप्त करतील त्यांना विशेष प्रोत्साहन देऊन गौरविण्यात येईलअशाप्रकारची घोषणा महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी व्यक्त केली.


मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्यासाठभ् २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महसुली अर्थसंकल्पांतर्गत एकूण १५२३७.०९ कोटी रुपये व भांडवली अर्थसंकल्पांतर्गत २२१९.७१ कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेतील निरंतर प्रयत्नांद्वारे आम्ही केवळ आजारांवर उपचार करत नसून भविष्याकरिता अधिक निरोगी व आनंदी मुंबई घडवित आहोत असे गगराणी यांनी स्पष्ट केले.



रुग्णालयीन नागरी सुविधा केंद्र उभारणी


रुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्णा व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता विविध मुलभूत सुविधा जसे की स्नानगृह, शौचालय, यांत्रिक धुलाई सेवा, इत्यादी सुविधा सीएसआर मार्फत उभारण्यात येणार आहे. त्यांचे प्रचलन पे अँड पार्कच्या ' धर्तीवर करण्यात येईल. या उपक्रमाच्या क्रॉस सबसिडी मधून रुग्णालयामधील सर्व शौचालयांची सफाई मानकांच्या निकषानुसार करण्यात येईल. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारामध्ये रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील,असा विश्वास गगराणी यांनी व्यक्त केला.



जेनेरिक मेडिकल स्टोअर्स


एनएसीओएफ संचालित संचलित जेनरिक मेडिकल स्टोअर्स मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार, नागरिकांना परवडणारी व गुणवत्तापूर्ण नॉन-शेड्युल औषधे उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील ५० निवडक ठिकाणी नॅशनल ऍग्रीकल्चर को ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एनएसीओएफ संचलित जेनरिक मेडिकल स्टोअर्स सुरु करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे रुग्णांचा औषधांवरील खर्च कमी होईल आणि वाजवी व विश्वासार्ह नागरी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण होईल.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि