Reay Road Railway Bridge : पूल विभागाचे अधिकारी गैरहजर, रे रोड रेल्वेवरील पुलाच्या वाढीव कामाचा प्रस्ताव केला दप्तरी दाखल

स्थायी समितीने व्यक्त केली तीव्र नाराजी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक पुलांची तसेच उड्डाणपुलांची कामे सुरु असून या अंतर्गत रे रोड येथील रेल्वे लाईनवरील पूल तोडून त्यांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कंत्राट कामांच्या खर्चात वाढ झालेली आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत आला असता प्रत्यक्षात सदस्यांच्या प्रश्नांचे निरसर करण्यासाठी पूल विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने प्रशासनाचा निषेध करत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला आहे. ( Reay Road Railway Bridge)



मुंबईतील रे रोड येथील रेल्वे लाईनवरील पूल (आरआेबी) पाडून त्यांच्या पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व रेल्वे संयुक्त उपक्रम असलेल्या संस्थेद्वारे करण्याच्या कामामध्ये फेरफार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीसमोर ८ जुलै २०२६ रोजी सादर करण्यात आला होता. या पुलाच्या कामांसाठी १९६.०७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु आता त्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त २३.७५ कोटी रुपयांचा खर्च वाढला गेला आहे. २१९.८३ कोटी रुपयांच्या एकूण कंत्राट कामाच्या या प्रस्तावावर उबाठाचे रमाकांत रहाटे यांनी मागील बैठकीत काही मुद्दे उपस्थित केले होते. (Railway Bridge Work)


परंतु गुरुवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी पुकारण्यात आला असता रहाटे यांनी या संबंधित पुलांचे अधिकारी कोण आहेत का याबाबत विचारणा केली आहे.


यापुलाच्या खर्च वाढवण्यास मंंजुरी दिली जात असली तरी येथील पदपथ तसेच इतर सुख सुविधांची माहिती देण्यात यावी. तिथून गळती होत आहे, मग यासर्वांबाबतची माहिती मिळणे आवश्यक आहे. परंतु या पूल विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या दप्तरी दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले. ( Maharashtra News)

Comments
Add Comment

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा

Free ST Travel : आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना मोफत एसटी प्रवास; जाणून घ्या कोणत्या मार्गांवर धावणार विशेष बस?

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.