'गाडगेबाबांचा जीवन संदेश आचरणात आणण्याची गरज'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा, गोरगरीब रुग्णांची सेवा, निवारा या सर्व सेवाकार्यांवर महत्वपूर्ण भर दिला असून गाडगे महाराजांचा हा जीवन संदेश सर्वांनी आचरणात आणणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले. संत गाडगे महाराजांच्या १५० व्या जयंतीचा कार्यक्रम सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात असलेल्या गाडगेबाबा धर्मशाळेत सोमवारी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.



महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मी त्यांच्या येथील कार्यक्रमामुळे प्रभावित झाले आहे.त्यासोबतच घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे स्वच्छतेचे बरेच उपक्रम आम्ही राबविणार असून नगरसेवकांसोबत या उपक्रमामध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळाल्यास स्वच्छतेमध्ये आपण उच्चांक गाठू, असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला. यापुढील काळात आपल्या संस्थेद्वारे आयोजित स्वच्छतेच्या विविध उपक्रमांमध्ये मला सहभाग घ्यायला आवडेल,असेही महापौरांनी यावेळी सांगितले. यावेळी महापौरांच्या हस्ते रुग्णांना फळे व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या स्त्री रोग तज्ञ डॉ. राजश्री कटके, गजाननराव नागे, संस्थेचे एकनाथ ठाकूर, उत्तमराव लोणारकर, अमोल ठाकूर, सत्यवान नर आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला