वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मंत्री नितेश राणे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

वनक्षेत्रातील जलाशयांमध्ये मत्स्यव्यवसायाला परवानगी देण्याबाबत मंत्री नितेश राणे आणि मंत्री गणेश नाईक यांची संयुक्त बैठक.


मुंबई  : वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मागणी मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. दरम्यान, अनधिकृत मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाचा महसुली तोटा होत असल्याचे नमूद करून लहान व मोठ्या माशांचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे मत मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत व्यक्त केले.


राज्यातील बिगर संरक्षित वनक्षेत्रातील जलाशयांमध्ये शासन मान्यता प्राप्त मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत मत्स्यव्यवसायाला परवानगी देण्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि वनमंत्री गणेश नाईक यांची संयुक्त बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीस वने विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक म्हैसकर यांच्यासह वने व मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलावामध्ये अनधिकृत मत्स्यमारी सुरू असल्याचे निर्दशनास येत असल्यास अनधिकृत मासेमारी तातडीने बंद करावीत. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तसेच गस्तीची संख्या वाढवून अनधिकृत मासेमारी होऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाला दिले.


यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयारण्य व राखीव वनक्षेत्रात कायद्याने मासेमारीस परवानगी देता येत नसल्याचे सांगितले. यावर मंत्री गणेश नाईक यांनी कायद्याच्या चौकटीत आणि सर्वोच्च न्यायालये तसेच केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करून काही जलाशयांमध्ये अटी शर्तीसह परवानगी देता येईल का, यांचा अभ्यास वन विभागाने करून पुन्हा बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.

Comments
Add Comment

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी