महापौर थेट धडकल्या राजावाडी रुग्णालयात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाची मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी शनिवारी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी पाहणी करून रुग्णालयीन व्यवस्थेचा व स्वच्छतेचा आढावा घेतला. महापौर थेट अचानक धडकल्याने रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.



महापौर रितू तावडे यांनी राजावाडी रुग्णालयातील महिला वैद्यकीय रुग्ण कक्ष, प्रसुती कक्ष, पुरुष वैद्यकीय कक्ष, प्रसूती कक्ष,प्रसुती पूर्व कक्ष, बालरोग विभाग, पुरुष शल्यचिकित्सा कक्षाला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना बाहेरून औषधी आणाव्या लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता, औषध पुरवठा व वितरण ,लसीकरणाचा पुरवठा व वितरण याची नोंदवही तपासून दैनंदिन व नियमितपणे लसीकरण होण्यासाठी संबंधितांना योग्य ती नोंद घेण्याचे निर्देश दिले.


दूर्धर आजारामध्ये इंजेक्शनचा पुरवठा का होत नाही ? याची माहिती महापौरांनी घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक लावण्याचे निर्देशही अधिष्ठातांना यावेळी दिले. राजावाडी रुग्णालयाचे पुनर्विकासाचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यातील काम हे अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले असता, संबंधित अधिकाऱ्यांना महापौरांनी विचारणा केली. रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बांधकामाचा संपूर्ण परिसर आच्छादित करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.


महापौरांनी यावेळी थाळी पद्धतीने होणाऱ्या अन्नपुरवठ्यामध्ये थाळीचा दर्जा चांगला ठेवण्याचे निर्देशही यावेळी दिले. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जुनी वायरिंग काढून नविन टाकण्याचे व रंगरंगोटी करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. यावेळी स्थानिक नगरसेवक धर्मेश गिरी,प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (माध्यमिक आरोग्य सेवा ) डॉ.चंद्रकांत पवार, वैद्यकीय अधीक्षका डॉ. भारती राजूलवाला उपस्थित होत्या.

Comments
Add Comment

Shatrughan Sinha: खामोश शब्द वापराल तर..., मुंबई उच्च न्यायालयाने घातली बंदी

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाकडून दिग्गज अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावीर नगर ,पोयसर जिमखाना परिसर अतिक्रमण मुक्त

वाढीव बांधकामे आणि अनधिकृत स्टॉल्स जमीनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरीवली आणि कांदिवली येथील अनधिकृत

सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी मुंबईकरांना बनवणार फिट

'फिट मुंबई' पुढाकार अंतर्गत वांद्रे येथे 'फिट सॅटर्डे' मोहीम संपन्न मुंबई (विशेष प्रतिनिधी) : व्यायाम न

‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी, राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन मुंबई : पर्यावरण

Nashik Mumbai : खड्ड्यांचं टेन्शन खल्लास! फक्त १२० मिनिटांत गाठाल मुंबई; नाशिक ते मुंबई प्रवासासाठी सरकारचा 'सुपर प्लॅन' काय आहे?

नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार

मुंबई मोनोरेलच्या नवीन रेक (Rolling Stock) व सीबीटीसी -आधारित सिग्नलिंग प्रणालीस सुरक्षा प्रमाणन प्राप्त

मुंबई :  मुंबई मोनोरेलच्या नवीन रेक (RST) तसेच सीबीटीसी-आधारित सिग्नलिंग प्रणालीस स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता