महाराष्ट्रात एप्रिलपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन

निवडणूक आयोगाचे २२ राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी निर्देश


नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशव्यापी मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन (एसआयआर) जाहीर केले आहे. मतदार यादीचे सखोल पुनरावलोकन प्रक्रिया १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. आता एसआयआर उर्वरित २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविली जाईल. या २३ राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने सर्व २३ राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून एसआयआरची तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. एसआयआर १ एप्रिल २०२६ पासून सुरू होऊ शकते.


एसआयआरआधीच बिहारमध्ये राबविण्यात आला आहे. देशातील अंदमान व निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सध्या एसआयआर सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोगाने १९५१ ते २००४ दरम्यान देशभरात आठ वेळा एसआयआर केले. आता २१ वर्षांनंतर एसआयआर केले जात आहे.



एसआयआर का केले जाते?


 मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन ही प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोग राबवते. यात प्रत्येक मतदाराची ओळख, वय, पत्ता आणि पात्रता पुन्हा तपासली जाते. बूथ लेव्हल ऑफिसर घरोघरी जाऊन माहिती पडताळतात आणि मतदारांकडून माहितीपत्रक भरून घेतात. पडताळणीनंतर मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदी वगळल्या जातात तसेच नवीन पात्र नागरिकांची नावे समाविष्ट केली जातात. याचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवणे हा असतो.

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक