हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधी यांचे नवे जामीनदार

मुंबई   : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. आरएसएसबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. या खटल्यातील एक महत्वाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते न्यायालयात उपस्थित राहिले होते. राहुल गांधी यांचे आधीचे जामीनदार आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकोरकर यांचे निधन झाल्यामुळे त्यांचा जामीन रद्द झाला होता. पुन्हा नव्याने जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.


भिवंडी न्यायालयात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात खटला सुरू आहे. राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी भिवंडीतील सोनाळे गावात प्रचार सभा घेतली होती. या सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान राहुल यांनी केल्याचा आरोप आहे. राजेश कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याने संघटनेची बदनामी झाल्याचा दावा करत त्यांनी भारतीय दंड संहिता कलम ५०० अन्वये खासगी फिर्याद न्यायालयात खटला दाखल केला होता.


या प्रकरणात फिर्यादीची सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे पोलिस अधिकारी सायकर यांचीही सरतपासणी नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना माजी केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी जामीन दिला होता. काही महिन्यांपूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. त्यामुळे राहुल यांना नवीन जामीन देणे आवश्यक होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांना जामीन दिला. न्यायाधीश पी. एम. कोळसे यांच्या न्यायालयात ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर न्यायाधीशांनी राहुल गांधींना जामीन मंजूर केला.

Comments
Add Comment

Ashwini Bhide: गारगाईसह समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती द्या; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे जलखात्याला आदेश

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४००

पश्चिम आशियातले युद्ध आणखी पेटणार, अमेरिकेचे दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधील सर्वात मोठा उंच पूल नष्ट; ८ मृत्यू, ९५ जखमी तेहरान  - आखाती देशात अमेरिका इस्रायल

मध्य रेल्वेचा शनिवार, रविवार मेगा ब्लॉक; उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार तसेच परळ आणि करी रोड

महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होताच आश्विनी भिडे यांनी घेतला धाडसी निर्णय

ई-ऑफिस,पेपरलेस करण्याचे सर्व खात्यांना दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी

पश्चिम रेल्वेवर आज वांद्रे येथे 'मेजर ब्लॉक'

मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान 'जम्बो ब्लॉक मुंबई : वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान असलेल्या मोऱ्या

‘एमआयडीसी’च्या बनावट पत्राद्वारे अधिवेशनाच्या पासची विक्री

६ जणांना अटक; मंत्रालय आणि विधिमंडळ सचिवालयातील कर्मचाऱ्यांचा कारनामा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय