...तर एसटी तिकीट दर भरावा लागेल; तिकीट सवलतींसाठी एसटीचे नवे नियम काय?, जाणून घ्या

पुणे: महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची समोर येत आहे. एसटी प्रवासात विविध सवलत योजनांचा लाभ घेताना आता केवळ आधार कार्ड किंवा इतर जन्मतारखेचा पुरावा असणारी ओळखपत्र पुरेसं ठरणार नाही. महिलांना ५० टक्के आणि ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना १०० टक्के तिकीट सवलत हवी असेल तर कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) काढावं लागणार आहे. अन्यथा तिकिटाचे पूर्ण पैसे मोजावे लागतील.


एसटीच्या माध्यमातून २६ ऑगस्ट २०२२ पासून काही प्रवर्गांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली होती. तसेच १७ मार्च २०२३ पासून महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. आतापर्यंत या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड दाखवणे आवश्यक होते. परंतु आता शासनाने नियमांमध्ये बदल केला असून सवलतीचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) जवळ असणे बंधनकारक केले आहे.



नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य


एनसीएमसी कार्ड नसल्यास महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासासाठी पूर्ण तिकीट दर भरावा लागणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे एसटी प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एनसीएमसी कार्डद्वारे सवलतींची अचूक नोंद ठेवली जाणार असून व्यवहार पूर्णपणे रोखविरहित पद्धतीने होणार आहेत. तसेच सवलतींची प्रतिपूर्ती ही पारदर्शक रीतीने होणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक सक्षम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


एनसीएमसीच्या नव्या नियमांनुसार प्रवाशांना एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये मोजावे लागणार आहेत. आधीचे स्मार्ट कार्ड परत करणाऱ्यांना सवलतीच्या दराने म्हणजे १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळेल. हे कार्ड फक्त ओळखपत्र नाही तर प्री-पेड वॉलेटसारखे काम करेल. यात किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवणे आवश्यक असणार आहे. प्रवाशांना ५० रुपयांच्या पटीत ते रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे आता कार्ड असेल तर या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.


आतापर्यंत आधार कार्डच्या आधारे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा प्रवास कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय मिळत होता. पण आता एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्यात आल्याने प्रवाशांना नवीन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कार्ड काढण्यासाठी केंद्रांवर जावे लागणे, ते वेळेवर रिचार्ज करणे तसेच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पूर्वी सोप्या पद्धतीने मिळणारी सवलत आता अधिक गुंतागुंतीची का करण्यात आली? असा सवाल काही प्रवाशांकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा