Fake Universities: देशात तब्बल ३२ बनावट विद्यापीठांचे जाळे; यूजीसीने दिला सावधतेचा इशारा

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशात (Fake Universities) वाढत चाललेल्या बनावट विद्यापीठांच्या जाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी देशाच्या ८ राज्यांमध्ये बनावट विद्यापीठे होती. त्यात वाढ होऊन आता १२ राज्यात शिक्षण माफिया पोहचले आहेत. तर बनावट विद्यापीठांची संख्या २० वरून ३२ झाल्याचे यूजीसीने सांगितले आहे.


यूजीसीने विद्यर्थी व पालकांना दिलेल्या इशाऱ्यात म्हंटले आहे की अशा बोगस संस्थांमध्ये कधीही प्रवेश घेऊ नये. बेंगळुरू, कर्नाटक येथील ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी नावाच्या फेक संस्थेच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यूजीसीच्या संकेतस्थळावर फेक विद्यापीठांची पूर्ण यादी उपलब्ध असून प्रवेश घेण्यापूर्वी ती नक्की तपासावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. फेक विद्यापीठे गावोगावी आपले जाळे पसरवत आहेत आणि दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना फसवत आहेत. देशातील ३२ बोगस विद्यापीठांपैकी दिल्लीमध्ये १२ विद्यापीठे आहेत, काही संस्था तर यूजीसीच्या कार्यालयापासून फक्त काही मीटरवर आहेत.



बनावट विद्यापीठांची माहिती:-


दिल्ली (१२): ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्स, कर्मशियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, वोकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनीअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, अध्यात्मिक युनिव्हर्सिटी, वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशनल युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनीअरिंग, माउंटेन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोल्यूशन.


पश्चिम बंगाल (२): इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन, इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन अँड रिसर्च


उत्तर प्रदेश (४): गांधी हिंदी विद्यापीठ प्रयाग, महामाया टेक्नीकल युनिव्हर्सिटी नोएडा, नेताजी सुभाष चंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी, अलीगढ व भारतीय शिक्षा परिषद भारत भवन, लखनऊ


हरियाणा (१): मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, फरीदाबाद


झारखंड (१): दक्ष युनिव्हर्सिटी, रांची


विदेशी विद्यापीठांच्या नावाखाली बोगस संस्थांनी जाळे पसरवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच, श्रीलंकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीने यूजीसीकडे पत्र पाठवून महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या बोगस विद्यापीठाविरुद्ध तक्रार केली होती.


विद्यार्थ्यांनी सतर्क राहून यूजीसीच्या अधिकृत यादीत नोंदलेलीच विद्यापीठे निवडावी, अन्यथा भविष्यात शिक्षण आणि करिअरवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन