शिक्षण समिती अध्यक्ष होताच राजेश्री शिरवडकर यांच्या टेबलावर पुष्पगुच्छा ऐवजी वह्या,पेन्सिलचा खच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात न आल्यामुळे शुक्रवारी निवडणुकीची औपचारिता पार पाडत निवडणूक पिठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवडकर यांच्या नावाची घोषणा केली. शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न आणता लाँगबूक आणण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तसेच हिंतचिंतकांना केले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देताना चक्क पुष्पगुच्छ ऐवजी वह्यांची पेन्सिल भेट दिल्या. त्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्षांच्या टेबलवर चक्क वह्या आणि पेन्सिलचा खच जमा झाला होता.


शिक्षण समितीवर बऱ्याच कालखंडानंतर भाजपचा नगरसेवक विराजमान झाला असून भाजपच्या हाती तिजोरीच्य चावीसोबतची शिक्षण व्यवस्थेचीही गुरुकिल्ली आली आहे. पिठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी नवनिर्वाचित शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना पुष्पगुच्छ देत त्यांना अध्यक्षपदावर स्थानापन्न केले. शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या भाषणात राजेश्री शिरवडकर यांनी महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक आव्हानांसाठी सज्ज करण्याकरिता प्रत्येक शाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबची सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने मी व्यक्तिशः लक्ष देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करीन असे आश्वासन दिले.


तसेच विद्यार्थ्यांमधील विविध कला कौशल्याला वाव देण्यासाठी तसेच त्यांना कौशल्याची माहिती होण्यासाठी महानगरपालिकेने २२० कौशल्य विकास केंद्रे सुरु केली आहेत. आता विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ही कौशल्य विकास केंद्रे वाढविण्याच्याही सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. शिक्षण खात्यातर्फे बालवाडी ते इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांच्या सुदृढ शारिरीक वाढीसाठी पुरक पोषण आहार दिला जातो. यापुढेही विद्यार्थ्यांना दर्जात्मक पोषण आहार मिळेल,याची मी दक्षता घेईन असे नमुद करत विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या मोफत २७ शालोपयोगी वस्तू शाळेच्या पहिल्या दिवशीच एकत्रितपणे मिळतील अशाप्रकारे नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच इयत्ता ५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरुकता विकसित होण्यासाठी सन २०२६-२०२७ मध्ये प्रशानामार्फत राबविण्यात येणारा 'इको वॉरियर्स' हा उपक्रम स्तुत्य असून त्याचा मी स्वतः पाठपुरावा करीन,असेही नमुद केले. महानगरपालिकेच्या तरतुदीनुसार माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनींना साधारणतः नेहमी वापरात असलेले सॅनिटरी नॅपकीन पुरविले जात असून त्याऐवजी पर्यावरणपूरक आणि जैवविघटन होणारे नॅपकीन पुरविण्याबाबत पाठपुरावा करीन. अनुदानित व विनाअनुदानित तत्वावर चालविण्यात येणा-या खाजगी शाळांना मान्यता तथा मुदतवाढ व अनुदानाकरिता विविध समस्यांना तोंड दयावे लागते यामध्ये सुधारणा तथा सुसुत्रता करण्याचा मी प्रयत्न करीन अशीही ग्वाही दिली.


हार - पुष्पगुच्छ नकोत; विद्यार्थ्यांसाठी वही - पेन द्या


शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या शुभेच्छा देताना कोणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपयोगी ठरणारी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू शुभेच्छा किंवा भेट म्हणून आणाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्‍या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी केले आहे. हार - पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षण व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. या उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत मिळून आवश्यक मूलभूत साधनांची पूर्तता होणार आहे. औपचारिक शुभेच्छांऐवजी शिक्षणात गुंतवणूक करण्याचा हा सकारात्मक व सामाजिकदृष्ट्या उपयुक्त संदेश असल्याचे शिरवडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावल्या, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या