Weather Update: हवामानात मोठा बदल, पुढील 24 तास..., हवामान विभागाने दिला इशारा

मुंबई: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे आणि याच हवामान बदलाचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस हवामानात सतत बदल राहतील. उकाडा अधिक जाणवेल. १ जानेवारी २०२६ रोजी राज्यासह देशातील अनेक भागात मोठा पाऊस झाला. या अवकाळी पावसानंतर राज्यातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. आता राज्यातून जवळपास थंडी गायब झाली आहे. सकाळच्या वेळी थोड्या प्रमाणात गारवा जाणवतो पण दिवसभर उष्णता जाणवते. थंडी कमी झाली आणि उन्हाचा चटका जाणवत असला तरीही वायू प्रदूषण अजून काही कमी झाले नाही. वायू प्रदूषण सातत्याने वाढताना दिसत आहे.


उन्हाचा चटका वाढला असला तरीही राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण राहिल. आज राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ होईल. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे १३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ब्रह्यपुरी येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरी येथे ३५.७ सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.


उत्तर प्रदेशच्या बांदा येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. बांदा येथे ८.२ सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. देशातील उच्चांकी तापमानाची नोंद केरळ येथे झाली असून केरळ येथे ३६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मात्र, थंडी बऱ्यापैकी गायब झाली असली तरीही अजून पावसाचे संकट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला.


पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, जम्मू आणि कश्मीरमधील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यासोबतच दिल्लीसह मुंबईतही प्रदूषण वाढताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांचा विचार करता दिल्लीतील प्रदूषण बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण मुंबईतील प्रदूषणात सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे.

Comments
Add Comment

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा

Nagpur News : नागपूरमध्ये २८ वर्षीय एअर होस्टेसची गळफास घेऊन आत्महत्या; मध्यरात्री प्रियकराशी फोनवर बोलली अन्...

नागपूर : नागपूरमधील लकडगंज (Nagrpur News) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. नुकतीच

Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात आता 'एआय'साठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महावितरणची आर्थिक पुनर्रचना करणार मुंबई : राज्याच्या प्रशास